उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारा अतिशय गोड, रसाळ असं फळ म्हणजे लिची. बाहेरील कवच गुलाबी रंगाचे असले तरीही आतील गर मात्र पांढरा रसाळ असतो. मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान लीची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच या फळाच्या सेवनाचे शरीराला अनेक फायदे आहेत. या फळामध्ये कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स आदी पोषक घटक असतात ; जे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. पण, तुम्ही कधी लिचीपासून तयार केलेली मिठाई खाल्ली आहे का? नाही… तर सोशल मीडियावर एका युजरने लिची या पदार्थापासून मिठाई कशी बनवायची हे दाखवलं आहे. चला तर पाहू या पदार्थाची सोपी रेसिपी.
साहित्य –
१. १५ ते २० लिची
२. १०० ग्रॅम मलाई पनीर (हा पनीर थोडा सॉफ्ट असतो).
३. एक चमचा रोझ सिरप
४. एक चमचा वेलची पावडर
५. दोन चमचे पिठी साखर
६. बारीक चिरून घेतला पिस्ता
हेही वाचा…
व्हिडीओ नक्की बघा…
कृती –
१. पंधरा ते वीस लिची घ्या. त्याचे साल काढा व त्यातील बिया काढून घ्या.
२. मलाई पनीर कुसकरून घ्या त्यात रोझ सिरप घाला.
३. नंतर त्यात वेलची पावडर, पिठी साखर घाला व पिठासारखे मळून घ्या.
४. त्यानंतर प्रत्येक लिची फळात हे तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित भरून घ्या.
५. नंतर लिची फळ बारीक चिरून घेतलेल्या पिस्तामध्ये हे बुडवून घ्या.
६. नंतर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा .
७. अशाप्रकारे तुमची लिचीपासून बनवलेली स्वादिष्ट मिठाई तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chefguntas या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने फळापासून बनवली जाणारी ही अनोखी मिठाई व्हिडीओत दाखवली आहे.
लिचीचे आरोग्यदायी फायदे –
लिचीमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लिचीमध्ये बीटा कॅरोटीन, रायबोफ्लेविन आणि फॉलेट सारखी तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच लिची खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. कारण – यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात.लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील डिहायड्रेशन दूर करून पाण्याची पातळी वाढण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. लिचीमध्ये पोटॅशियम आणि सोडिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्ताचा प्रवास योग्य रीतीने होण्यास मदत करतात. तर अशा आरोग्यदायी फायदे असणाऱ्या लिची या फळापासून तुम्ही घरच्या घरी हा गोड पदार्थ बनवून पाहू शकता.