शाळा, कॉलेज, क्लास, ऑफिसमधून घरी आल्यावर पहिला आपण हात-पाय स्वछ धुतो आणि स्वयंपाक घरात जाऊन आईने काही खायला केलं आहे का हे शोधायला लागतो. गरमागरम चहा आणि काही तरी चटपटीत नाश्ता समोर दिसला की दिवसभरातील सगळा थकवा आपोआप निघून जातो. पण, हा चटपटीत नाश्ता बनवला नसेल तर तो कोण बनवणार या विचारानेच कंटाळा येतो. तर आज एका इन्स्टाग्राम युजरने अगदी १० मिनिटांत होणारा नाश्ताची एक सोपी रेसिपी सांगितली आहे. या रेसिपीचे नाव आहे “शेजवान पनीर टोस्ट”. चला तर पाहुयात या पदार्थाची सोपी रेसिपी…
साहित्य :
- ब्रेडचे सहा तुकडे
- सहा चीज स्लाइस
- दीड कप मोझेरेला चीज
- दीड चमचा बटर
- पनीर
- तीन चमचे शेजवान सॉस
- २ चमचे मेयॉनीज
- १/४ कप चिरलेली सिमला मिरची
- चवीनुसार काळी मिरी
- दीड चमचा चिली फ्लेक्स
- दीड चमचा ओरेगॅनो.
- चवीनुसार मीठ
हेही वाचा…‘कैरीची कोशिंबीर’ कधी खाल्ली आहे का? चटपटीत अन् पौष्टीक रेसिपी लगेच नोट करा…
कृती :
- सगळ्यात पहिला एक प्लेटमध्ये शेजवान चटणी घ्या.
- नंतर त्यात मेयॉनीज, बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, बारीक तुकडे करून घेतलेली सिमला मिरची, पनीर, काळी मिरी, मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यानंतर ब्रेडचा एक तुकडा घ्या. त्यानंतर सुरीने ब्रेडवर बटर लावून घ्या. त्यानंतर त्या ब्रेडवर चीजचे स्लाईज लावून घ्या.
- नंतर तयार करून घेतलेलं मिश्रण या ब्रेडवर स्प्रेड करून घ्या. त्यानंतर वरून चीजचे बारीक तुकडे, रेड चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो चवीसाठी घाला.
- त्यानंतर जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये किंवा तव्यावर हे सर्व ब्रेड ठेवा आणि झाकण ठेवा.
- दहा मिनिटांत तुमचे “शेजवान पनीर टोस्ट” तयार.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tarladalal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.