लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे ‘आईस्क्रीम’. भरपूर जेवल्यानंतर कितीही पोट भरले तरी आईस्क्रीम समोर आल्यावर त्याला कोणीही नाही म्हणत नाही. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेव्हरमध्ये आईस्क्रीम तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. तुमच्यातील अनेकांनी लहानपणी ऑरेंज कॅण्डी हे आईस्क्रीम नक्कीच खाल्लं असेल. तर तुम्हाला देखील कोणताही अतिरिक्त पदार्थ मिक्स न करता घरच्या घरी हे आईस्क्रीम खायला मिळालं तर तुम्हाला आवडेल का ? हो. तर आज एका युजरने हे ऑरेंज आईस्क्रीम बनवायच कसं हे एका व्हिडीओत दाखवलं आहे. चला तर पाहुयात ऑरेंज आईस्क्रीमची सोपी रेसिपी.

साहित्य : संत्री

gobi keema recipe
Gobhi Keema Recipe: एका कोबीपासून बनवा ‘ही’ झणझणीत रेसिपी, लिहून घ्या साहित्य आणि कृती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

कृती :

  • गोड संत्री घ्या.
  • न चुकता त्यातील बिया काढून घ्या.
  • एका ट्रे मध्ये बिया काढून घेतलेल्या संत्र्याच्या फोडी ठेवा आणि मग तीन तास फ्रिजमध्ये ठेवा.
  • त्यानंतर संत्र्याच्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • दोन ते तीन मिनिटांत तुमचे संत्र्याचे ऑरेंज आईस्क्रीम तयार.

हेही वाचा…संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेडपासून बनवा ‘हा’ गरमागरम पदार्थ; फक्त १० मिनिटांत होईल तयार

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम ॲपवर @nehadeepakshah या अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या युजरने ‘संत्र्याचे आईस्क्रीम’ कसं बनवायचं हे दाखवलं आहे.

Story img Loader