Udid Pakoda Sambar Recipe In Marathi: सकाळच्या नाश्त्यासाठी रोज काय नवीन बनवायचं हा प्रश्न गृहिणींना पडलेलाच असतो. त्यात पोहे, उपमा, शिरा, इडली सांबार, मेदूवडा असे अनेक पदार्थ रोजच्या रोज घरी बनतात. रोज तेच तेच खाऊन अनेकांना कंटाळाही येतो. म्हणूनच आज आपण एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत, जी तुम्ही क्वचित कधी बनवली असेल. आज आपण उडीद पकोडा सांबार ही डिश घरच्या घरी कशी बनवू शकता ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली साहित्य आणि कृती एकदा वाचाच…
साहित्य
- 1 मिरची+१ आल्याचा तुकडा
- 1/2 टिस्पून मिरपुड
- 2 टिस्पुन चिरलेली कोथिंबीर
- ४० ग्रॅम तुरडाळ व मुगडाळ हळद हिंग मिक्स करून शिजवलेली
- 1-2 शेवग्याच्या शेंगाचे तुकडे वाफवलेले
- 1 कांदा उभा चिरलेला
- 1 टोमॅटो उभे चिरून
- 1 टिस्पून मोहरी जीरे
- 5-6 कडिपत्ता पाने
- 1 पिंच हिंग
- 3-4 बोरी मिरच्या
- 1-2 टिस्पून काश्मिरी तिखट
- 1/4 टिस्पुन हळद
- 1-2 टेबलस्पुन सांबार मसाला
- चविनुसार मीठ
- आवश्यकते नुसार चिंचेचा कोळ, गुळ पावडर
- १-२ टेबलस्पुन फोडणीसाठी तेल
- २५० ग्रॅम तेल वडे तळण्यासाठी
- आवश्यक वाटल्यात तिखट
कृती
उडदाची डाळ व मेथीदाणे स्वच्छ धुवून त्यात पाणी भरून ६-७ तास भिजवा. नंतर परत स्वच्छ धुवून सर्व पाणी काढून मीठ, मिरची, आले टाकून पेस्ट करून घ्या.
सांबारासाठी तुरडाळ व मुगडाळ हळद, हिंग मिक्स करून शिजवून ठेवा.
वाटलेली डाळ मोठ्या वाटीमध्ये काढून त्यात मिरपुड व चिरलेली कोथिंबीर मिक्स करून हाताने चांगली फेटुन घ्या. त्याचवेळी कढईत तेल गरम करायला ठेवा.
फेटलेल्या डाळीचे लगेच पकोडे गरम तेलात तळुन काढा(उडदाच्या डाळीची पेस्ट जास्तवेळ तशीच ठेवली व नंतर पकोडे केले तर ते तेलकट होतात व सॉफ्टही होत नाहीत)
अशाप्रकारे सर्व पकोडे तळून घ्या.
कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरे, हिंग, कडिपत्ता, बोरी मिरच्या परतून घ्या.
नंतर त्यात उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, हळद, काश्मिरी तिखट, सांबार मसाला मिक्स करून परता व झाकण ठेवून २-४ मिनिटे शिजवा.
नंतर त्यात गरम गरम शिजलेली डाळ मिक्स करा. उकळी काढा नंतर चविप्रमाणे मीठ व चिंचेचा कोळ, गुळपावडर मिक्स करून उकळी काढा शेवटी कोथिंबीर मिक्स करा.
गरमागरम सांबार बाऊलमध्ये व उडिदवडे प्लेटमध्ये कोथिंबिर शिवरून सर्व्ह करा.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.