Ukadpendi Recipe : नेहमी नेहमी नाश्त्याला काय करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. नेहमी नेहमी ढोकळा, इडली, पोहे, उपमा, डोसा खाऊन तुम्ही कंटाळला असाल पण आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही नाश्त्याला पौष्टिक अशी उकरपेंडी करू शकता. ही विदर्भातील अतिशय लोकप्रिय अशी रेसिपी आहे. गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी ही रेसिपी चवीला अत्यंत स्वादिष्ट वाटते. लहानांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना आवडेल अशा हा नाश्ता आहे. एवढंच काय तर पोटभर नाश्ता करायचा असेल तर आवर्जून ही गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी उकरपेंडी बनवा. ही उकरपेंडी कशी बनवायची, जर तुम्हाला माहिती नसेल तर ही लगेच ही रेसिपी नोट करा. नाश्त्यासाठी ही उकरपेंडी एक उत्तम पर्याय आहे.
साहित्य
- गव्हाचे पीठ
- दही
- जिरे
- मोहरी
- तेल
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- लसूण
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- हिंग
- टोमॅटो
- कढीपत्ता
- बारीक चिरलेली कोथिंबीर
हेही वाचा : Urad Dal Khichdi : मकर संक्रांतीला बनवा उडीद डाळीची खिचडी, लगेच रेसिपी जाणून घ्या
कृती
- सुरुवातीला गव्हाचे पीठ तेल टाकून छान भाजून घ्या.
- सोनेरी रंग येईपर्यंत गव्हाचे पीठ भाजून घ्या.
- त्यानंतर एका कढईत तेल घ्या.
- तेल गरम केल्यानंतर त्यात जिरे मोहरी टाका.
- त्यानंतर त्यात कढीपत्ता टाका.
- त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची त्यात टाका.
- थोडी हटके चव येण्यासाठी तुम्ही बारीक चिरलेले लसूण टाकू शकता.
- त्यानंतर मध्यम आचेवर सर्व परतून घ्या.
- त्यानंतर त्यात हिंग, लाल मिरची पावडर, हळद, आणि चवीनुसार मीठ घालू या.
- पुन्हा चांगले परतून घ्या.
- त्यानंतर त्यात टोमॅटो घाला.
- टोमॅटो छान शिजू द्या.
- त्यानंतर त्यात भाजून घेतलेले गव्हाचे पीठ टाका.
- आणि सर्व मिश्रण एकत्र करा.
- त्यात थोडे दही घाला
- त्यानंतर त्यात कोमट पाणी घाला.
- आणि शेवटी थोडा वेळ शिजू द्या.
- शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- तुमची गरमा गरम उकरपेंडी तयार होईल.
- तुम्ही ही उकरपेंडी दहीबरोबर खाऊ शकता.