Upvas Patties Recipe in Marathi: hi: अनेकदा उपवास असला की साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. अनेकदा महिला उपवासाच्या विविध रेसिपी ट्राय करत असतात. पण नेहमीच त्या रेसिपींना यश मिळेल असं नाही. तुम्हालाही जर या साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण उपवासाचे पॅटीस कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य…
साहित्य
- 200 ग्रॅम साबुदाणा
- 100 ग्रॅम वरीचे पीठ
- 2 उकडलेले बटाटे
- 1/2 वाटी शेंगदाणे कुट (जाडसर)
- 4 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर चे मिश्रण
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
- आवश्यक असल्यास अगदी थोडे पाणी
कृती
सर्वप्रथम उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यावा शेंगदाणे चांगले भाजून घेऊन त्याची पूड करावी आणि वरीचे पीठ असेल तर मिक्सरमधून बारीक करून त्याचे पीठ तयार करून घ्या.
ग्राइंडर मधून चार मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालून हे मिश्रण तयार करून ठेवावे आता उकडलेला बटाटा, साधारण आठ तास भिजवलेला साबुदाणा वरीचे पीठ आणि चिमूटभर मीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित तयार करून मळून ठेवावे.
तयार पिठाचे हव्या तेवढ्या आकाराचे गोल करावे त्यानंतर गॅस वरती एका कढईमध्ये तेल घेऊन ते छान तापले की त्यामध्ये तयार पॅटीस खरपूस तळून घ्यावेत.
तयार आहेत खमंग,कुरकुरीत,चविष्ट असे उपवासाचे पॅटीस.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.