महाराष्ट्रात वारकर्‍यांसह विठू माऊलीच्या भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे मोठे महत्त्वाचे सोहळे आहे. आषाढीला पंढरपुरात जाऊ शकले नाही तरी अनेकजण घरात एकादशीचे व्रत करून विठू माऊलीकडे प्रार्थना करतात. मग यंदा तुम्ही देखील आषाढी एकादशीचं व्रत करणार असाल तर जाणून घ्या या उपवासानिमित्त तुम्ही घरच्या घरी कोणते खास पदार्थ बनवून एकादशीचं व्रत पाळू शकता. सर्वसाधारण नियमांप्रमाणे, एकादशीचा उपवास करणारा व्यक्ती व्रतादरम्यान केवळ फलाहार आणि दूध पिऊ शकतो. परंतू तुम्हांला ते शक्य नसेल तर या व्रताच्या निमित्त तुम्ही घरच्या घरी काही उपवासाचे पदार्थ बनवू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आज उपवासाची एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात रताळ्याचा कीस कसा करायचा

रताळ्याचा कीस साहित्य :

  • रताळी २ मोठी, शेंगदाण्याचा जाडसर कूट १ वाटी
  • ओलं खोबरं, १/२ वाटी, साजूक तूप १/४ वाटी
  • हिरवी मिरची ५-६ बारीक चिरलेली
  • जिरे १ चमचा

रताळ्याचा कीस कृती

  • प्रथम रताळी स्वच्छ धुऊन सालासकट किसून पाण्यात ठेवा. कढईत तूप आणि जिरं टाका. जिरे तडतडल्यावर मिरची घाला. त्यावर पाण्यात किसून ठेवलेली रताळी पिळून घाला आणि परता. त्यावर मीठ, साखर घालून शिजवून घ्या.
  • वाफ आल्यावर त्यात दाण्याचा कूट, खोबरं घालून नीट एकत्र करा आणि परत वाफ आणा. टीप : रताळ्याचे सत्त्व पाण्यातून रताळ्याचा कीस काढल्यावर पाणी तसेच १-२ तास ठेवा.
  • रताळ्याचे सत्त्व तसेच खाली बसेल. वरचं पाणी काढून टाका आणि सत्त्व काढून घ्या. १ वाटी सत्त्वाला २ वाटय़ा दूध आणि चवीप्रमाणे साखर घालून १/२ चमचा वेलची पावडर घालून गॅसवर गरम करत ठेवा. सतत ढवळत राहा.
  • घट्ट झाल्यावर एका थाळीत काढून पसरून घ्या आणि थंड झाल्यावर वडय़ा पाडा. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.

हेही वाचा – चवळीचे कुरकुरीत कटलेट, संध्याकाळच्या नाश्ता होईल एकदम टेस्टी, ही घ्या सोपी रेसिपी

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी

हे पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता.

Story img Loader