Navratri 2023: नवरात्रीनिमित्त नऊ दिवस उपवास असल्याने रोज काय बनवयाचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यात रोज साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचा लाडू, रताळे, बटाट्याचे वेफर्स, भगरीची भाकरी, असे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला कुरकुरीत बटाटा ट्रँगल्स कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जे तुम्ही नवरात्रीत उपवास असेल, तर नक्की आजमावून पाहा.
बटाटा ट्रँगल्स साहित्य –
- ३ ते ४ उकडलेले बटाटे
- १ वाटी साबुदाणे पीठ
- २-३ हिरवीमिरची
- १/२ चमचा जिर
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल किंवा तुप
बटाटा ट्रँगल्स कृती
- सर्व प्रथम साबुदाणे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. उकडलेले बटाटे बारीक किसून घ्यावे.
- किसलेल्या बटाट्यात बारिक चिरलेली हिरवी मिर्ची, जिर आणि चवीनुसार मीठ घालावे (उपवासाला चालत असल्यास कोथिंबीर देखील घालू शकता).
- त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर साबुदाणे पीठ एकत्र मळुन त्याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे.
- नंतर पोळी पाट वर हा गोळा ठेवून त्यावर १ चमचा तेल टाकून लाटून किंवा थालीपीठ प्रमाणे एकसामान करून घ्यावा.
- त्यानंतर सुरीच्या साहाय्याने लाटलेली पोळी ही ट्रँगल्स/त्रिकोनि आकारात कापून घ्यावी. त्यानंतर तेल गरम करून कमी गॅस फ्लेमवर तळून अथवा श्यालोफ्राय करुन घ्यावे .
हेही वाचा >> मार्केटसारखा परफेक्ट “पावभाजी मसाला” आता घरीच; जाणून घ्या सोपी मराठी पद्धत
- अशा प्रकारे कुरकुरीत बटाटा ट्रँगल्स खाण्यासाठी तयार होतात. हे बटाटा ट्रान्गल तुम्ही दही सोबत खाऊ शकता.