Sankashti Chaturthi Special Recipe : उपास हा अत्यंत प्रेमाने, भक्तीने आणि श्रद्धेने करायची गोष्ट आहे. उपास ही गोष्ट श्रद्धा, भक्ती, भावनेशी निगडीत असली तरी ती पोटाच्या आरोग्याशीही निगडीत आहे. यामुळे बरेच जण आठवड्यात एक दिवस तरी उपवास करतात. विशेषत: संकष्टीनिमित्त अनेक उपवास ठेवतात. पण प्रत्येकवेळी उपवासाला फळं, साबूदाणा आणि भगरची खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काय करावे असा प्रश्न उपस्थित निर्माण होतो. त्यांच्याकरिता आम्ही तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून अशी उपवासाची एक रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे उपवासाची इडली. उपवासाच्या दिवशी होणाऱ्या अ‍ॅसिडिटीवर ही उपवासाठी इडली रामबाण ठरणार आहे. त्यामुळे उपवासाची इडली कशी बनवायची ते जाणून घेऊ..

साहित्य

२५० ग्रॅम भगर, १२५ ग्रॅम साबूदाणा, आले, हिरवी मिरची, मीठ, जिरे यांची वाटून घेतलेली पेस्ट, एक चमचा तेल, दही, ७-८ उकडलेले बटाटे, शेंगदाणा कूट, तिखट, मीठ, मिरची, कोथिंबीरची वाटण

Sun God has entered the sign of Venus
सूर्य देवाने शुक्रच्या राशीमध्ये केला प्रवेश! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळणार अपार धन और पद-प्रतिष्ठा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Gold & Silver Price Hike: Record High Rates Before Diwali
Gold Silver Price : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ! चांदीचा दर ९० हजाराच्या पुढे; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
help prevent car theft
कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत
shani
Shani Margi 2024: शनीची प्रतिगामी चाल ‘या’ राशींच्या आयुष्यात घेऊन येईल आनंदाचे दिवस, मिळेल पैसाच पैसा
sun transit
कोजागरी पोर्णिमेनंतर सुर्य देव बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा
Rohit Sharma Lamborghini Urus Blue car number plate
मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसणाऱ्या रोहितच्या लॅम्बोर्गिनीची किंमत किती? कारचा नंबर तर आहे खूपच खास
Mohamed Muizzu india visit
अन्वयार्थ: मुईझ्झूंना भानप्राप्ती…

कृती

भगर, साबूदाणा प्रथम धुवून घ्या. त्यात आले, हिरवी मिरची, मीठ, जिरे, पेस्ट एकत्र करुन एक चमचा तेल घालून सर्व मिश्रण भिजेल एवढे दही घालावे. ७-८ तास भिजवावे. उकडलेले बटाटे बारीक मळून त्यात दाण्याचे कूट, मिरची, मीठ वैगरे मसाला घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. त्याचे छोटे गोळे करावे. या बटाट्याच्या गोळ्यातून छोटी कचोरी होईल एवढे भगर- साबूदाण्याचे सारण भरावे आणि सर्व गोळ्यांना इडलीसारखा फुगीर बसका आकार देऊन इडलीपात्रात किंवा छोट्या वाट्यांना तेल लावून त्यात ते घालून वाफवून घ्यावे. वाफवल्यावर सुरीने हलकेच काढून घ्यावे. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

त्यामुळे तुम्हालाही उपवासाला फळं, साबुदाणे खिचडी, भगर खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी ट्राय करु शकता.