Shravan fasting Recipe : उपवास म्हटलं की आपल्यााल उपवासाचे पदार्थ खायला मिळणार या कल्पनेनेच अनेकांना छान वाटतं. श्रावण महिन्यात सोमवार, शनिवार, शुक्रवार अशा बऱ्याच वारी उपवास करण्याची पद्धत आहे. आपण बहुतांसवेळा उपवासाला साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी नाहीतर उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ असे ठराविक पदार्थच खातो. हे पदार्थ खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. त्यापेक्षा घराच सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासूनच थोडे हटके पदार्थ केले तर पोट भरते आणि मनही खूश होते. पण तुम्ही उपवासाला कधी अप्पे खाल्लेत का? ही घ्या टेस्टी बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी
साहित्य
- १ वाटी शिंगाड्याचे पीठ
- २ मॅश केलेले बटाटे
- अर्धा टीस्पून जिरे
- ५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- २ चमचे दही
- पाणी
- मीठ चवीनुसार
कृती
- सर्वात आधी पिठ चाळून घ्या.
- एका ताटात चाळलेले पीठ, उकडलेले बटाटे मॅश करून, जीरे, चिरलेल्या मिरच्या, दही सर्व आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिक्स करून घ्या.
- नीट पेस्ट करा.
- त्यात बेकींग सोडा आणि सेंधव मीठ घालून नीट हलवा.
- १० मिनीटे झाकून ठेवा.
- अप्पे पात्र गॅसवर गरम करा.
- त्याला नीट तूप लावा.
हेही वाचा – श्रावण विशेष: कांदा भजी विसरुन जाल! ट्राय करा भोपळ्याच्या फुलांची भजी
- मध्यम आचेवर अप्पे दोन्ही बाजूने नीट शेकून घ्या.,