Navratri 2023: नवरात्रीनिमित्त नऊ दिवस उपवास असल्याने रोज काय बनवयाचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यात रोज साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचा लाडू, रताळे, बटाट्याचे वेफर्स, भगरीची भाकरी, असे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उपवासाचे अप्पे कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जे तुम्ही नवरात्रीत उपवास असेल, तर नक्की आजमावून पाहा.
वरईचे आप्पे साहित्य :
- १ कप वरई
- पाव कप साबुदाणा
- ३ कप दही
- जिरे
- मीठ
- हिरव्या मिरचाच ठेचा
वरईचे आप्पे साहित्य :
- सर्वप्रथम साबुदाणा मिक्सरला दळून घ्यायचा. दळून झाल्यानंतर त्यामध्ये वरई घालून पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घ्यावे.
- मग साबुदाणा आणि वरई मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
- मग त्यामध्ये एक चमचा जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर मिश्रणात थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं.
- अशा प्रकारे तुम्ही उपवासाच्या आप्प्यांचे पीठ तयार करा. (टिप – पीठ जास्त पातळं आणि जास्त घट्ट नको) आप्प्यांचं पीठ तयार झाल्यानंतर ते १५ , २० मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे.
- त्यानंतर आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये तेल सोडा आणि जे बॅटर तयार करून घेतलं आहेत ते आप्पे पात्रात घाला.
हेही वाचा >> खान्देशी पद्धतीची चटकदार झणझणीत हिरव्या वाटणातील मसाला वांगी; एकदा खाल तर खातच रहाल!
- मग झाकणं ठेवून ते २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यायचे आणि पुन्हा त्यात तेल सोडून दोन्ही बाजूने नीट भाजून घ्यायचे.
- अशा प्रकारे तुमचे उपवासाचे आप्पे तयार सर्वांना सर्व्ह करा.