Upvasache Ghavan : उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाला नवीन काहीतरी ट्राय करू शकता. तुम्ही वरई आणि साबुदाणापासून बनविलेले स्वादिष्ट घावन बनवू शकता. हे घावन अत्यंत पौष्टिक असते. आज आपण घरच्या घरी उपवासाचे घावन कसे बनवायचे, हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य:

  • वरई
  • साबुदाणा
  • हिरव्या मिरच्या
  • नारळ
  • शेंगदाण्याचा कूट
  • साजूक तूप
  • जिरे
  • मीठ

हेही वाचा : Garlic Chutney : झणझणीत अन् चटकदार लसणाची चटणी कशी बनवावी? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

कृती :

  • साबुदाणा आणि वरई एकत्र ४-५ तास भिजवून ठेवावी.
  • त्यानंतर साबुदाणा आणि वरईमध्ये मिरची, खोबरे, शेंगदाणे, मीठ टाकावे आणि मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे.
  • हे मिश्रण घट्ट भिजवावे.
  • एका नॉनस्टीक तव्याला तूप किंवा तेल लावावे.
  • आणि पातळसर मिश्रण तव्यावर टाकावे.
  • कडेने तूप सोडावे
  • हे गरमागरम घावन तुम्ही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upvasache ghavan recipe how to make upvasache ghavan for fast if you bored of sabudana khichdi ndj
Show comments