Upwasachi Idli Recipe In Marathi: अनेकदा उपवास असला की साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे अशा पद्धतीचे पदार्थ खाल्ले जातात. अनेकदा महिला उपवासाच्या विविध रेसिपी ट्राय करत असतात. पण नेहमीच त्या रेसिपींना यश मिळेल असं नाही. तुम्हालाही जर या साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण उपवासाची इडली कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य…
साहित्य
- 1 कप वरई (भगर)
- 1/2 कप भिजवलेला साबुदाणा
- 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 1/2 कप दही
- चवीप्रमाणे सैंधव मीठ किंवा साधं मीठ
- 1 टीस्पून इनो किंवा खायचा सोडा
- गरजेप्रमाणे पाणी
- चटणी चे साहित्य
- ओले खोबरे,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,शेंगदाणे,जीरे ,मीठ,दही, साखर
कृती
वरई स्वच्छ धुवून, पाणी घालून २-३ तास भिजत ठेवणे.साबुदाणा ही भिजत ठेवणे.
भगरीतील पाणी काढून घेणे.मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेणे. नंतर साबुदाणा घालून २-३मिनिटे फिरवून घेणे. बटाट्याच्या फोडी करून घेणे. ते ही घालून २-३ वेळा फिरवून घेणे.
हे मिश्रण एका भांड्यात काढून घेणे. मिरचीचे तुकडे किंवा मिरचीचे वाटण घालून घेणे.दही व मीठ घालून मिक्स करून घेणे.१०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवणे.
ओलं खोबरं, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, जीरे, मीठ व पाणी घालून मिक्सरमध्ये चटणी वाटून घेणे.*जीरे, कोथिंबीर चालत नसतील तर घालू नये.
चटणीला साजुक तूप,जीरे, लाल मिरची वाळलेली यांची फोडणी देऊ शकता.
मिश्रण जरा फुगलेले दिसेल.एकदा हलवून घेणे.इडलीच्या भांड्यात पाणी घालून गरम करत ठेवणे.इडली पात्राला तेल/तूप लावून घेणे.
इडली पिठात इनो व त्यावर थोडं पाणी घालून घेणे. फसफसल्यावर पिठात मिक्स करून घेणे.इडली पात्रात थोडं-थोडं पीठ घालून घेणे. इडली पात्र सर्व भांड्यात ठेवून घेणे. वरून झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घेणे.
इनो किंवा सोडा करतानाच घालावा.थोडया थोड्या करणार असाल तर,तेवढयाच पिठात इनो किंवा सोडा घालून घेणे.
पंधरा मिनिटांनी झाकण काढून, सुरीने इडली झाली का नाही ते चेक करणे. सुरी स्वच्छ निघाली तर, इडली झाली असे समजावे. गॅस बंद करावा. इडली पात्र बाहेर काढून थंड होऊ देणे.
इडली थोडी थंड झाल्यानंतर सुरीने काढून घेणे. गरम असताना काढू नये. नाहीतर तुटू शकतील.
गरमागरम इडली चटणी सोबत खावी.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.