Urad Dal Khichdi : मकर संक्रांती या नवीन वर्षातील पहिल्या सणाला दान धर्म इत्यादी दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य प्रत्येक महिन्याला एक रास बदलत असतो. जानेवारी महिन्यात धनु राशीचा त्याग करुन सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीला खूप छान खाद्य संस्कृती सुद्धा लाभली आहे. मकर संक्रांतीला तिळ गुळाचे लाडू आवडीने करतात. जानेवारी महिन्यात थंडी खूप जास्त असते. अशावेळी थंडीपासून दूर ठेवण्यासाठी उष्ण पदार्थ म्हणजेच तीळ आणि गूळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर संक्रांतीच्या दिवशी खास उडीद डाळीची खिचडी सुद्धा बनवली जाते. उडीद डाळ खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, आपला स्टॅमिना सुद्धा वाढतो. उडीद डाळीत कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व बी ६, मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम यांचे प्रमाण भरपूर असते. इडली, डोसा, मेदूवड्यासारखे चविष्ट पदार्थ सुद्धा उडदापासून बनवले जातात. तुम्ही नेहमी तूर, मूग, मसूर डाळीची खिचडी अनेकदा खाल्ली असेल पण तुम्ही उडीद डाळ खिचडी खाल्ली आहे का? आज आपण ही खिचडी कशी बनवायची, हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मीठ
  • पाणी
  • तूप
  • कोथिंबीर

हेही वाचा : Masala Pav : फक्त १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मसाला पाव, लगेच रेसिपी नोट करा

कृती

  • सुरुवातीला तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणानुसार तांदूळ घ्या.
  • त्यात तांदळाच्या प्रमाणा नुसार उडीद डाळ टाका. दोन्ही डाळ आणि तांदूळ चांगल्याने एकत्रित करा.
  • त्यानंतर तीन वेळा डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने चांगल्याने धुवून घ्या.
  • नंतर कुकर गॅसवर ठेवा.
  • कमी आचेवर त्यात धुतलेली उडीद डाळ आणि तांदूळ टाका आणि त्यानुसार पाणी घाला.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर त्यात तूप टाका.
  • कूकरचे झाकण नीट लावा.
  • कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्या.
  • उडीद डाळीची खिचडी तयार होईल.
  • सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तूप टाका.
  • ही गरमा गरम पौष्टिक खिचडी तुम्ही लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना खाऊ घालू शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urad dal khichdi recipe how to make urad dal khichdi makar sankranti special indian food ndj
Show comments