शुभा प्रभू साटम

साहित्य :

उरलेल्या कोरडय़ा उसळी, उकडलेला बटाटा, चाट मसाला, गरम मसाला, सोया चंक्स, रवा, चवीपुरते मीठ-तिखट, तेल.

कृती :

उसळ उरलेली असेल तरी त्यातला रस काढून घेऊन ती कोरडी करून घ्यावी. नाहीतर कबाबाचे मिश्रण पातळ होऊन जाईल. बटाटा कुस्करून घ्यावा. सोया चंक्स भिजवून पिळून घ्यावेत. आता उसळ, बटाटा, सोया चंक्स एकत्र कुस्करून एकजीव करून घ्यावेत. त्यात मीठ-तिखट, गरम मसाला, चाट मसाला घालून त्याचे गोळे बनवावेत ते रव्यात घोळून तेलात खरपूस तळून घ्यावेत किंवा भाजून-परतून घ्यावेत. सॉसबरोबर फस्त करावे.

Story img Loader