तुम्हाला मलईदार आणि मसालेदार ग्रेव्ही आवडते? तर तुम्ही ही सोपी वाल पापडी मेथी गोटे भाजी रेसिपी घरी नक्की करून पाहा. विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊयात या खास डिशची रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाल पापडी मेथी गोटे भाजी साहित्य

  • सोललेली आणि तुकडे केलेली वाल पापडी
  • दोन वाट्या बारीक चिरलेली कोवळी मेथी
  • वाटीभर डाळीचे पीठ वाटीभर
  • तिखट,मीठ,ओवा,तीळ,हळद गरम मसाला
  • कोथींबीर,ओले खोबरे फोडणीचे साहित्य
  • गुळ दाण्याचे कूट
  • बडिशेप

वाल पापडी मेथी गोटे भाजी कृती

प्रथम बारीक चिरलेल्या मेथी मधे हळद, तिखट, मीठ,ओवा,तीळ, बडीशेप,व डाळीचे पीठ घालून गोळा करून घ्यावा दहा मिनीटे झाकुन ठेवा

त्यानंतर हव्या त्या आकाराचे गोल गोटे करून मंद आचेवर तळून घ्यावेत

यानंतर तेलात मोहरी,हिंग,हळद घालून फोडणी करून सोललेली वाल पापडी घालावी, झाकण ठेवून चांगली वाफ द्यावी

त्यात वाल पापडी बुडेल इतकेच पाणी घालून शिजवावे, वाल पापडी शिजली की त्यात तिखट, मीठ,हळद,काळा मसाला, गूळ,दाण्याचे कूट घालून परत एक वाफ द्यावी.

शेवटी मेथी गोटे घालून पाच मिनिटे झाकण ठेवावे. व नंतर कोथींबीर ओले खोबरे घालून सजवावे. गरम भाकरी अथवा पोळी सोबत खायचा घ्यावी

ही भाजी खाण्याचे फायदे

वजन कमी करते : रितू त्रिवेदी सांगतात की, तुम्हाला लठ्ठपणा घालवण्यासाठी स्वस्त उपाय हवा असेल तर वालाच्या शेंगा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. वालाच्या शेंगांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : बीनच्या शेंगांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात, जी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला सर्दी आणि इतर प्रकारच्या संसर्गामुळे त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बीनच्या भाजीचा अवश्य समावेश करा.