Valentine Special Lava Cake Recipe In Marathi: फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ हा सगळ्याच जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा संपूर्ण आठवडा दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. याच व्हॅलेंटाईन विकला लवकरच सुरुवात होणार आहे. आजच्या लेखात आपण आपल्या प्रियजनासाठी होम मेड “व्हॅलेंटाईन स्पेशल लाव्हा केक” कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

२ मोठे पाकिट ओरियो बिस्किटे

दूध

इनो लेमन फ्लेवर

चोको चिप

कॅडबरी

कृती

प्रथम एका भांड्यात बिस्किटे आणि त्यातील व्हाईट भाग वेगळा करून वरील बिस्किटांचा भाग मिक्सरला लावून घ्या. आणि आतील व्हाईट क्रिमचा काही भाग सजावटीसाठी ठेवा.

आता मिक्सर मधील मिश्रण एका भांड्यात ओतून त्यात आवश्यकतेनुसार दूध ओतून चांगले एकाच दिशेने फेटून घ्या. मिश्रण चांगले एकजीव झाले की त्यात एक छोटा चमचा इनो घालून ते ऍक्टिव होण्यासाठी एक चमचा दूध ओतून पुन्हा एकदा एकजीव करा.

आता दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून कढई वर झाकण ठेवून कढई मंद आचेवर गरम करायला ठेवा. आता हार्ट शेप केक पात्राला आतून बटर लावून त्यावर बटर पेपर लावा.

आता वरील अर्धे मिश्रण पात्रात ओतून वरून चोको चिप्स आणि कॅडबरीचे तुकडे घालून वरून पुन्हा उरलेले मिश्रण ओता. आणि हे पात्र कढईत स्टॅण्डवर ठेवून वरून झाकण ठेवून अर्धा तास बेक करा.

अर्ध्या तासानंतर झाकण काढून केक बेक झाला की नाही हे सुरी घालून चेक करा. सुरीला केक चिकटला नाही तर केक तयार…

केक कढईतून काढून थोडा थंड झाला की वरून चाॅकलेट सिरप ने सजवा. २० मिनिटे फिज मध्ये सेट करा.