Valentine Day Special Cheesy Garlic Stuff Mushroom Recipe In Marathi: २०२५ वर्षातील फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि हा म्हणता म्हणता व्हॅलेंटाईन डे देखील आलाच. या दिवशी तुमच्या जोडीदाराला, मुलांना आणि आई वडिलांना तुम्ही ही रेसिपी करून सरप्राईज देऊ शकता. अगदी झटक्यात होईल अशी ही मशरूमची रेसिपी सगळेच आवडीने खातील. रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असतोच आणि अशा खास दिवशी काही खास केलं तर पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं. यानामित्ताने चला तर मग जाणून घेऊ या, चिजी गार्लिक स्टफ मशरूमची रेसिपी.
साहित्य
१५० ग्रॅम मशरूम
4-5 मिरच्या
2-3 टेबलस्पून बारीक चिरलेला लसुण
1-2 टेबलस्पून बारीक चिरलेले आले
1-2 टेबलस्पून मिरची आलेलसुण ठेचा
1 टिस्पून मिरपुड
३० ग्रॅम बारीक केलेले चिज
1 टेबलस्पून बटर
1 टेबलस्पून तेल
1 शिमला मिरची
२५ ग्रॅम मटार
चवीनुसार मीठ
कृती
सर्व मशरूम२-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवुन ठेवा, रेसिपी साठी लागणारे इतर साहित्य काढुन ठेवा आले, लसुण बारीक चिरून ठेवा, मिरच्या उभ्या चिरून ठेवा. चिज चे बारीक तुकडे करून त्यात मिरची आलेलसणाचा ठेचा, मिरपुड व किंचित मीठ मिक्स करून स्टफिंग करून ठेवा
मशरूम कोरडे करून दांडी काढून वरील चिजचे स्टफिंग मशरूम मध्ये भरून घ्या. कढईत तेल बटर गरम झाल्यावर त्यात लसुण आले व मिरच्या मिक्स करून परतत रहा. नंतर त्यात सिमला मिरचीचे काप मिक्स करून थोडे मीठ टाकुन परतुन घ्या
नंतर त्यात स्टफ केलेले मशरूम मांडुन लावा त्यात वाफवलेले मटार मिक्स करा गॅस स्लो करून वरून झाकण ठेवुन५ मिनिटे शिजवा नंतर झाकण काढुन पाणी सुकेपर्यंत शिजवा आपले चिजी गार्लिक स्टफ मशरूम रेडी
गरमागरम चिजी गार्लिक स्टफ मशरूम प्लेट मध्ये सर्व्ह करा