Vangyache Bharit : वांगे हा अनेकांचा आवडता भाजीप्रकार आहे. अनेकांना वांग्याची भाजी आवडते. सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात ताज्या भाज्या बाजारात येतात. आता सुद्धा हिरवा भाजीपाला आणि भरीताचे वांगे बाजारात आले आहेत. वर्षभर वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आता तुम्ही वांग्याचे भरीत बनवू शकता. हिवाळ्यात वांग्याचे भरीत खाण्याची मजा एक वेगळीच असते. वांग्याचे भरीत, भाकरी, ठेचा, झुणका हा हिवाळ्याती खास मेन्यू असतो.
तुम्हीही हिवाळ्यात वांग्याच्या भरीतचा आस्वाद घेता का? वांग्याचे भरीत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. हिवाळ्यात याचा आस्वाद द्विगुणित होतो. वांग्याचे भरीत आणि भाकरी लोकं आवडीने खातात. तुम्हालाही वांग्याचे भरीत आवडते का? तुम्हाला माहिती आहे का वांग्याच भरीत दोन पद्धतीने बनवले जातात. तुम्ही कधी वांग्याचे कोरडे भरीत खाल्ले आहे का? होय. कोरडे भरीत. कोरडे भरीत हे भाजलेल्या वांग्याला फोडणी न देता बनवले जाते. शेतांच्या बांधावर शेतकरी कुटूंबात असे भरीत आवर्जून बनवले जातात. हे वांग्याचे कोरडे भरीत कसे बनवायचे, हे आज आपण जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • कोवळी वांगी
  • बारीक चिरलेले कांदे
  • बारीक चिरलेली मिरची
  • लाल तिखट
  • मीठ
  • बारीक किसलेले ओले खोबरे
  • कोथिंबीर
  • तेल

हेही वाचा : Kothimbiricha Zunka : असा बनवा कोथिंबिरीचा झणझणीत झुणका, रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरुवातीला वांगी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर ती स्वच्छ कापडाने पुरुन घ्यावी
  • या वांग्यांवरुन तेलाचा हात फिरवावा आणि नंतर हा वांगी चांगली भाजून घ्यावी.
  • भाजलेल्या वांग्याची साल आणि देठे काढावीत
  • त्यानंतर वांगे हाताने कुस्करुन घ्यावे.
  • नीट कुस्करल्यानंतर त्यात बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरेलली मिरची, थोडे लाल तिखट, मीठ
  • इत्यादी साहित्य टाकावे आणि चांगले एकत्रित करावे.
  • शेवटी यावर तुम्हाला आवडत असेल तर बारीक किसलेले खोबरे टाकावे
  • आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • तुमचे वांग्याचे भरीत तयार होणार
  • हे गरमा गरम वांग्याचे भरीत तुम्ही भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करू शकता.