सँडविच म्हटलं की ते सगळ्यांच्या आवडीचं असतंच. आपण काहीवेळा सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी टाईमला सँडविच आवडीने खातो. ब्रेडला चटणी, बटर लावून त्यात काकडी, टोमॅटो, बीट, बटाटा घालून हे पौष्टिक सँडविच खाण्यासाठी तयार असते. परंतु सध्याच्या बदलत्या काळानुसार सगळेच आपल्या आरोग्याची अतिशय काळजी घेताना दिसून येतात. आरोग्याची काळजी घेताना आपण काहीवेळा तेलकट, तुपकट पदार्थ खाणे सोडून देतो. मात्र आम्ही तुमच्यासाठी खास आणि स्पेशल असं वऱ्हाडी पद्धतीची सँडविचची रेसिपी घेऊन आलो आहोत.
वऱ्हाडी सँडविच साहित्य
- ब्राऊन ब्रेड
- बटर
- ५-६ बटाटा
- ३ कांदे बारीक चिरलेले
- १ टीस्पून हिरवी मिरची ठेचा
- १ टेबलस्पून लाल मिरची ठेचा
- मीठ चवीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- ४-५ टेबलस्पून तीळ
- घरी बनवलेला मसाला (खडे मसाले घालून) ४ चमचा
- २ चमचे चाट मसाला
- २ चमचे लाल मिरची पावडर
- १ चमचा कस्तुरी मेथी
- १५ जणांसाठी ३० स्लाइस वापरावे लागतील. १ सँडविच १ जणांसाठी पुरेसे
वऱ्हाडी सँडविच कृती
स्टेप १
सारण तयार करण्यासाठी प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. नंतर थंड झाल्यावर त्यास कुचकरावे. मग त्यात चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, घरी बनवलेला मसाला, चाट मसाला, लाल तिखट, चवीपुरते मीठ, कस्तुरी मेथी अशे सर्व पदार्थ घालून त्याला चांगले मिक्स करावे.
स्टेप २
ब्राऊन ब्रेड च्या दोन स्लाइस घ्यावे. नंतर त्या दोन्ही स्लाइस ला चांगले बटर लावावे. व त्याच्या एका स्लाइस ला हिरवी मिरची ठेचा आणि दुसर्या स्लाइस ला लाल मिरची ठेचा लावावा.
स्टेप ३
आता एका ब्रेड स्लाइस वर बटाट्याचं सारण टाकावं व दुसरी बाजू नीट कव्हर करावं.
हेही वाचा >> नागपूरची गरमागरम सांबारवडी, भरपूर कोथिंबीर घालून केलेला अप्रितम पदार्थ एकदा नक्की बनवा, ही घ्या रेसिपी
स्टेप ४
शेवटी दोन्ही बाजूच्या स्लाइस ला चांगले बटर लाऊन त्याला खमंग असं ग्रिल करून आनंद लुटावा.