गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस बाप्पाचे घरोघरी आगमन होते. बाप्पाच्या स्वागतासाठी त्याचा आवडीचा मोदक, लाडू तयार करतात. कोणी उकडीचे मोदक तयार करते तर कोणी तळणीचे. कोणी विविध प्रकारचे लाडू तयार करते. बाप्पाबरोबर घरातील सर्व मंडळी प्रसादाच्या उकडीच्या मोदकांचा आस्वाद घेतात. पण रोज रोज गोड प्रसाद कंटाळा आला असेल तर लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही वाटली डाळ बनवू शकता. अनेक लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यामुळे त्यांना गोड प्रसाद खाता येत नाही अशा लोकांसाठी हा प्रसाद उत्तम पर्याय आहे. वाटली डाळ चवीला चटपटीत असतेच पण बनवायला देखील अगदी सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. घाईच्या वेळी पटकन तयार होईल असा हा नाश्ताचा पदार्थ आहे. उन्हाळ्यात या वाटल्या डाळीत कैरी देखील घालतात त्याला कैरीची डाळ बनवतात. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी…

वाटली डाळ रेसिपी

वाटली डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ वाटी तूर डाळ
  • २ चमचे तेल
  • दीड चमचा मोहरी
  • अर्धा चमचा हिंग
  • एक चमचा हिरवी मिर्ची आणि मोहरी
  • हिरवी मिरची आणि जिरे
  • एक चमचा हळद
  • १०-१२ / कढीपत्ता
  • १ चमचा – साखर
  • चवीनुसार – मीठ
  • गरजेनुसार – पाणी
  • २ चमचे ओले खोबरे
  • १ अर्धा चमचा कोथिंबीर

हेही वाचा – तुम्हाला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर घरीच बनवा मसाला कॉर्न, एकदा खाल तर खातच रहाल

How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

वाटली डाळ बनवण्याची कृती

  • प्रथम दोन वाटी डाळ ६ तास भिजवून घ्य़ा.
  • मिक्सरमध्ये डाळ वाटून घ्या
  • पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी टाकात.
  • मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरे टाका.
  • त्यानंतर त्यात मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाका.
  • त्यात हळद, कडीपत्ता टाका आणि परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात वाटलेली डाळ टाका आणि चांगली परतून घ्या.
  • सर्व एकत्र झाल्यानंतर त्यात थोडी साखर टाका. चवीनुसार मीठ टाका आमि त्यात पाणी टाकून वाफवून घ्या.
  • त्यात ओले खोबरे आणि कोथिंबीर टाका.
  • गरमा गरम वाटली डाळ खायला द्या. तुम्हाला असेल तर तुम्ही त्यावर शेव घालू शकता.

हेही वाचा –पोहे अन् कच्चा बटाटा वापरून झटपट बनवा खमंग खरपूस नाश्ता, दही आणि लोणच्याबरोबर खा

बाप्पाच्या नैवद्यासाठी वाटली डाळ हा पदार्थ अनेक घरांमध्ये आवर्जून बनवला जातो. तुम्ही देखील एकदा हा पदार्थ बनवून पाहा.