गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस बाप्पाचे घरोघरी आगमन होते. बाप्पाच्या स्वागतासाठी त्याचा आवडीचा मोदक, लाडू तयार करतात. कोणी उकडीचे मोदक तयार करते तर कोणी तळणीचे. कोणी विविध प्रकारचे लाडू तयार करते. बाप्पाबरोबर घरातील सर्व मंडळी प्रसादाच्या उकडीच्या मोदकांचा आस्वाद घेतात. पण रोज रोज गोड प्रसाद कंटाळा आला असेल तर लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही वाटली डाळ बनवू शकता. अनेक लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यामुळे त्यांना गोड प्रसाद खाता येत नाही अशा लोकांसाठी हा प्रसाद उत्तम पर्याय आहे. वाटली डाळ चवीला चटपटीत असतेच पण बनवायला देखील अगदी सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. घाईच्या वेळी पटकन तयार होईल असा हा नाश्ताचा पदार्थ आहे. उन्हाळ्यात या वाटल्या डाळीत कैरी देखील घालतात त्याला कैरीची डाळ बनवतात. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा