Vegan Chocolate Ice-cream Recipe In Marathi: मे महिना संपून आता जून महिन्याला सुरुवात झाली आहे. असे असूनही उन्हाचा प्रभाव कमी झाला नसल्याचे पाहायला मिळते. उलट मे महिन्यापेक्षा जूनमध्ये जास्त उकडत आहे असे लोक म्हणत आहेत. दुपारी १२ ते ३ या दरम्यान उष्णतेचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी काहीजण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पंखा, एसीच्या समोर बसतात. तर काहीजण गार पाण्याने अंघोळ करतात. उन्हामध्ये उकडत असल्यावर अनेकजण आईसक्रीम खात असतात. दुकानामध्ये मिळणारी आईसक्रीम आपण घरी देखील बनवू शकतो. चला तर मग घरच्या घरी व्हेगन चॉकलेट आईसक्रीम कशी बनवायची ते जाणून घेऊयात..
साहित्य –
- ४२० मि.लि. नारळाचे दूध
- अर्धा कप पिठीसाखर
- दोनतृतीयांश कप कोको पावडर (साखरविरहित)
- अर्धा कप बदाम दूध (साखरविरहित)
- ४०० ग्रॅम भिजवलेले खजूर
- १ चमचा व्हॅनिला
कृती –
- १० मिनिटे थंड होण्यासाठी फ्रीजरमध्ये एक मोठा मिक्सिग बाऊल ठेवा.
- दरम्यान, फूड प्रोसेसरमध्ये खजुराची जाडसर पेस्ट करा.
- त्यात थोडे गरम पाणी घाला. बाजूला ठेवा. वरील मिश्रणात नारळ दूध आणि साखर टाका.
- मिश्रण मिक्सरमध्ये गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. वरील मिश्रणाचे दोन समान भाग करून घ्या.
- त्यातील एका भागात कोको पावडर, व्हॅनिला, बदामाचे दूध हे टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
- चवीनुसार फ्लेवर्स टाका. एका प्लास्टिकच्या भांड्यात मिश्रण काढून घ्या.
- त्या भांड्याला वरून पहिले प्लास्टिक आणि त्यावर फॉइलपेपर याने व्यवस्थित झाका.
- मूससारखं आईसक्रीम हवं असल्यास हे मिश्रण फ्रिजमध्ये दोन तास ठेवा व नीट जमण्यासाठी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.