आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी थंड, गारेगार पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी आपण कुल्फी, आईस्क्रीम, शीतपेय, सरबत असे वेगवेगळे थंड पदार्थखाणे पसंत करतो. उन्हाळ्यात असे अनेक थंड पदार्थ खाणे म्हणजे पर्वणीच असते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपला जीव कासावीस होतो. गरमा आणि वाढत्या उन्हामुळे वारंवार थंड खाण्याची इच्छा होतेच. या थंड पदार्थांमध्ये काहीतरी हेल्दी खायचा आपला मूड असेल तर फ्रुट कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे. फ्रुट कस्टर्ड अगदी लगेचं बनवून तयार होणारा तसेच घरातील सगळ्यांच्या आवडीचा थंड पदार्थ आहे. चला तर आज शेवया गाजर कस्टर्ड डेझर्ट बनवुयात..
शेवया गाजर कस्टर्ड डेझर्ट साहित्य
१.५ कप ज्वारीच्या शेवया
१.५ टीस्पून साजूक तूप
२५ कप मिल्क पावडर
२५ कप पिठी साखर
१.७५ कप दूध
१ टेबलस्पून custard पावडर
१ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
२५ कप पिठी साखर
५ टीस्पून इसेन्स
१ कप तयार गाजराचा हलवा
सुकामेवा
शेवया गाजर कस्टर्ड डेझर्ट कृती
१. सुरुवातीला सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
२. गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकावे. तूप पातळ झाल्यावर त्यात शेवया टाकाव्यात.
३. शेवया छान सोनेरी झाल्या की त्यात दूध पावडर टाकावे. मिक्स करावे. आता त्यात पिठीसाखर टाकावी.
४. चांगले मिक्स केल्यानंतर गॅस बंद करावा आणि बाजूला ठेवावे. एका बाऊलमध्ये पाव कप दूध घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून घ्यावे.
५. हे करेपर्यंत एका बाजूला भांड्यात गॅसवर दूध ठेवून त्याला उकळी आणावी. दूध उकळल्यानंतर त्यात तयार केलेले कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर चे मिक्स हळूहळू टाकून ढवळावे. दोन मिनिट शिजवल्यानंतर त्यात साखर टाकावी आणि पुन्हा शिजू द्यावे.
६. आता त्यात इसेन्स टाकावा आणि थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. आता आपले डेझर्ट सेट करण्यासाठी गाजराचा शिरा कस्टर्ड आणि शेवया तयार आहेत.
७. शेवया गाजर कस्टर्ड डेझर्ट सेट करण्यासाठी एका ट्रे घ्यावा. त्यात सुरवातीला, तूप लावून घ्यावे नंतर त्यात अर्ध्या शेवया पसरवून टाकाव्यात. एकाद्या वाटीने त्या दाबून घ्याव्यात. त्यानंतर त्यावर गाजराचा हलवा एकसारखा पसरवून घ्यावा. आता त्यावर कस्टर्ड पसरवून घ्यावे.
८. सर्वात शेवटी पुन्हा एकदा भाजलेल्या शेवया पसरवून घ्याव्यात. त्यावर आवडीनुसार सुकामेवा टाकून सजावट करावी. त्यानंतर सेट होण्यासाठी हा ट्रे फ्रिझर्मध्ये एक ते दीड तासाकरिता ठेवावा.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीचे ‘उकळीचे पिठले’ एकदा खाल तर खातच रहाल; ही घ्या सोपी रेसिपी
९. दीड तासाने काढून, सुरीच्या साहाय्याने कापून घ्यावे.
१०. अणि छान थंडगार, सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करावे, स्वादिष्ट, शेवयांचे, गाजर हलवा घालून केलेले शेवया गाजर कस्टर्ड डेझर्ट तयार आहे.