विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे विदर्भ स्पेशल डाळ भाजी.
डाळ भाजी ही अस्सल विदर्भातील पारंपरिक भाजी आहे. प्रत्येक समारंभात मानाचे स्थान पटकवलेल्या या भाजीला शतकांची परंपरा आहे. चला तर बघुयात ही भाजी कशी बनवायची.
विदर्भ स्पेशल डाळ भाजी साहित्य
१/२ कप चणाडाळ
१/४ कप मुगडाळ
१/४ कप तुरडाळ
१ कप पालक चिरलेला
१/४ शेंगदाणे
२ टेबलस्पून शेंगदाणे कुट
१/४ कप टोमॅटो
८/१० लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून आललसुण पेस्ट
३/४ कढीपत्ता
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपुड
१ टीस्पून जीरेपुड
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून काळा मसाला
१ टीस्पून मीठ
३ टेबलस्पून तेल
विदर्भ स्पेशल डाळ भाजी कृती
१. सर्व प्रथम चण्याची डाळ व शेंगदाणे दोन तास अगोदर भिजत घालावे आणि खालील प्रमाणे तयारी करावी.
२. एका कुकरमधे तेल घाला, तेल तापले की त्यात मोहरी घाला तडतडली की लसुण घालून गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर शेंगदाणे घालून थोडे परता, मिरची,कढीपत्ता टाका नी परता आता एक एक करत सर्व मसाले घाला. परता शेवटी हिंग नी दाण्याचे कुट घालून परता.
३. अशाप्रकारे फोडणी छान झाली आहे. आता धुतलेल्या डाळी घालून परता नि नंतर पालक टोमॅटो घाला आणि परत छान परतून घ्या. शेवटी साधारण २ कप पाणी घालून कुकरमधे शिजवून घ्या.
हेही वाचा >> विदर्भ स्पेशल: चमचमीत पनीर मसाला; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी रेसिपी
विदर्भ स्पेशल डाळ भाजी तयार आहे.चपाती भाता बरोबर छान लागते.