आंब्याच्या सीझनमध्ये विदर्भात आमरस आणि त्याच्या बरोबर तांदळाचे पापड आणि कुरडई घरोघरी करतात. उन्हाळा म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यासमोर आंबा येतोच. भर उन्हाळ्यात दुपारी गावाकडचे आंबे खाण्याची मज्जा काही औरच आहे. रसाळ आंबा खाण्यासाठी आंबाप्रेमी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंब्याचा सिझन सुरु होताच आपण आंब्याची पेटी आणतो. काही आंबे सोलून खातात तर, तर काही आंब्याच्या फोडी तयार करून खातात. तर काही आंब्यापासून आमरस, आम्रखंड, आंब्याची वडी असे पदार्थ तयार करतात. चला तर मग आज विदर्भ स्पेशल आमरस रेसिपी पाहुयात.

विदर्भ स्पेशल आमरस साहित्य

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

१ किलो मोठे आंबे
१ वाटी साखर
१ टेबलस्पुन वेलची पुड
१/२ टेबलस्पुन मीठ
बारीक चिरलेले ड्रायफूट
कुकिंग सूचनाट

विदर्भ स्पेशल आमरस कृती

१. सर्वप्रथम, पिकलेला आंबा थंड पाण्यात ठेवा. काही वेळानंतर आंबा धुवून घ्या. आता सुरीच्या मदतीने आंब्याची साल काढून घ्या, व सुरीने आंब्याच्या फोडी तयार करा किंवा गर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

२. आता मिक्सरच्या भांड्यात आंब्याच्या फोडी घ्या. त्यात २ चमचे साखर, कपभर दूध आणि बर्फाचे तुकडे घालून वाटून घ्या.

३. तयार आमरस एका बाऊलमध्ये काढून घ्या, व त्यात चिमुटभर वेलची पावडर आणि चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.

४. अशा प्रकारे इन्स्टंट गोडसर आमरस खाण्यासाठी रेडी. आपण आमरस पुरी, किंवा असेच देखील खाऊ शकता. तांदळाचे पापड आणि कुरडी सोबत आमरस सर्व करा।

५. आमरस केल्यानंतर काळपट पडतो, किंवा त्याची चव बिघडते. आमरस अधिक दिवस फ्रेश राहावे म्हणून आपण साठवताना काही टिप्स फॉलो करू शकता.

हेही वाचा >> झटपट बनवा आंबट गोड चटकदार कैरीची जेली; लहान मुलंही आवडीनं खातील

आमरस काळपट पडू नये म्हणून या टिप्स फॉलो करा

१. आमरस केल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

२. चांदीचे दागिने-पैंजण काळे पडलेत? एक भन्नाट ट्रिक-१५ मिनिटात चमकतील दागिने आणि भांडी

३. आमरस तयार करताना त्यात मीठ घालू नका. फक्त आवडीनुसार साखर घाला.

४. फ्रिजमध्ये आमरस स्टोर करून ठेवत असाल तर, काचेच्या डब्यात ठेवावे.

५. रस काढताना संपूर्ण पिकलेल्या आंब्याचा वापर करावा.