Methi Aalan : मेथी ही अत्यंत पौष्टिक पालेभाजी आहे. मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. सहसा आपण मेथीची भाजी किंवा मेथीचे पराठे खातो पण तुम्ही कधी मेथीचे आळण खाल्ले आहेत का? महाराष्ट्राच्या काही अन्य भागांमध्ये याला मेथीचं पिठलं सुद्धा म्हणतात. मेथीचे आळण, विदर्भ स्पेशल असलेली ही खास रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता. मेथीचे आळण घरी कसे बनवायचे, त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.
साहित्य :-
- मेथीची पाने
- हिरवी मिरची
- दही
- बेसन
- लाल मिरच्या
- तेल
- मोहरी
- हिंग
- हळद
- २ लसूणच्या पाकळ्या
- मीठ
हेही वाचा : केळी फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक तुम्हीही करता? जाणून घ्या दुष्परिणाम
कृती :-
- मेथीची पाने बारीक चिरुन घ्या
- कढईत तेल घ्या त्यात हिंग, मोहरी, कांदा, मिरचीची फोडणी द्या.
- चांगल्या स्वादासाठी लसूण बारीक चिरुन टाका.
- हळद आणि मीठ टाका
- त्यानंतर चिरलेली मेथीची पाने त्यात टाका
- थोडा वेळ मेथी शिजू द्या.
- त्यानंतर त्यामध्ये बेसन टाका आणि चांगले परतून घ्या.
- वरुन त्यात पाणी टाका आणि बेसन चांगले शिजू द्या.
- लाल मिरचीची फोडणी वेगळ्या कढईत करा
- आणि तयार मेथीच्या आळणावर टाका.