Vidarbha Special Recipe: विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे..भरवां टिंडे (ढेमसे)…चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार विदर्भ स्पेशलभरवां टिंडे (ढेमसे)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भ स्पेशल भरवां टिंडे (ढेमसे) साहित्य

२५० ग्राम कोवळे छोटे टिंडे
१०० ग्राम कांदे
४-५ पाकळ्या लसूण
१ छोटा तुकडा आले
१/४ वाटी सुके खोबरे किसून
२ लवंगा
२ वेलची
१ टेबलस्पून धणे
१ छोटा तुकडा दालचिनी
१ टेबलस्पून तेल
हळद, तिखट, मीठ, मोहरी,
१/४ टिस्पून गोडा मसाला
कोथिंबीर बारीक चिरून

विदर्भ स्पेशल भरवां टिंडे (ढेमसे) कृती

१. सर्वात आधी टिंडे स्वच्छ धुवून, पुसून दोन्ही बाजूची देठे काढून चिरा देऊन घ्या.

२. धणे, खोबरे, लवंग, वेलची, दालचिनी, खमंग भाजून घ्या.कांदा, लसूण आले नरम होईपर्यंत परतून घ्या.

३. मिक्सरमध्ये आधी कोरडा मसाला नंतर त्यात कांदा, लसूण आले वाटून घ्या.

४. वाटलेल्या मसाल्यात, मीठ, तिखट, हळद,गोडा मसाला, कोथिंबीर घालून एकत्र करा. हा मसाला टिंड्यात भरा.थोडा मसाला बाजूला ठेवा.

हेही वाचा >> १० मिनिटांत बनवा झणझणीत खानदेशी स्टाईल ‘मटकी वाटाणा रस्सा भाजी’, नोट करा सोपी रेसिपी

५. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी घाला.भरलेले टिंडे घालून पाण्याचे झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजवा. नंतर त्यात गरजेनुसार गरम पाणी आणि राहिलेला मसाला घालून ५-७ मिनिटे पुन्हा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.आपली टिंडे भाजी तयार आहे.गरम गरम सर्व्ह करा.