‘वांगी’ हा भाजीचा असा प्रकार आहे की अनेकजण आवडत नाही म्हणून नाकं मुरडतात. वांग्याची भाजी ताटात वाढलेली बघून आपल्याला जेवण नकोसे वाटते. वांग्यातील त्या लहान – लहान बिया असो किंवा अगदीच मऊ लगदा झालेल्या वांग्याचा फोडी असो, यांसारख्या अनेक कारणांनी आपल्याला वांगे खाणे आवडत नाही.म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विदर्भ रेसिपी डाळ वांगे रेसिपी. या पद्धतीनं वागं बनवाल तर नावडतीची भाजीही होईल आवडीची…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भ स्टाईल डाळ वांग साहित्य

  • १/४ काप चनादाळ
  • १/४ कप तुर डाळ
  • ३०० वांगी
  • २ कांदे कट केलेले
  • ७-८ लसून पाकळ्या
  • २ मिरच्या
  • ३ टेबलस्पुन सुके खोबरे किस
  • १ टेबलस्पून खस खस
  • २ टोमॅटोची प्युरी
  • ३ टेबल्स्पून तेल फोडणीसाठी
  • १ टेबलस्पून मोहरी जीरे
  • १/४ टीस्पून हिंग
  • १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  • १ टेब-स्पून गोडा मसाला
  • १ टेबलस्पून गरम मसाला
  • १/२ टेबलस्पून हळद पावडर
  • १ टेबलस्पून धना पावडर
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर बारीक कट केलेली

विदर्भ स्टाईल डाळ वांग कृती

स्टेप १
सर्वप्रथम दिल्याप्रमाणे दोन्ही डाळी धुन एक तास भिजवून घेऊ. भिजल्यानंतर डाळ पॅनमध्ये शिजवण्यासाठी टाकून घेऊन त्यात हळद आणि तेल टाकून डाळ कुकरमध्ये चार पाच शिट्या घेऊन शिजवून घेऊ.

स्टेप २
आता दिल्याप्रमाणे कांदे,लसूण,मिरची कट करुन तयार करून घेऊ. वांगी कवळी असतील तर तसेच मागचे देठ ठेवून काही नसेल तर फक्त हाफ कट वांगी करून घेऊ पाण्यात टाकून घेऊ.

स्टेप ३
आता कढईत थोडे तेल टाकून कांदे, लसूण,मिरची, खोबरे,खसखस भाजून घेऊ. भाजल्यानंतर मिक्सरपॉटमध्ये वाटण तयार करून घेऊ. टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊ.

स्टेप ४
आता फोडणीसाठी सगळे साहित्य तयार करून घेऊ. कढईत तेल टाकून मोहरी,जीरे,हिंग कांद्याचे वाटण टाकुन फ्राय करून घेऊ.

स्टेप ५
वाटण फ्राय झाल्यावर दिल्याप्रमाणे सगळे मसाले, मीठ टाकून घेऊ. मसाले फ्राय करून घेऊ नंतर त्यात वांगी टाकून फ्राय करून घेऊ.

स्टेप ६
फोडणीत वांगी व्यवस्थित फ्राय करून घेऊ तेलावर मसाले आणि वांगी व्यवस्थित मिक्स करून घेऊ

स्टेप ७
आता एक कप पाणी टाकून वांगी शिजवून घेऊन वांगी नरम शिजल्यानंतर टोमॅटो प्युरी टाकून घेऊ. टोमॅटो प्युरी वांग यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊ.

स्टेप ८
नंतर शिजलेली डाळ टाकून घेऊ डाळ घोटायची नाही अशीच टाकायची त्याच्यामुळे डाळ छान दिसते. वांगी पण मोठे पिस असल्यामुळे डाळ आणि वांगी दिसायलाही छान आणि चवीलाही छान लागते.

स्टेप ९
डाळ आणि वांगे एकत्र मिक्स करून शिजवून घेऊन शिजल्यानंतर शेवटी कोथिंबीर टाकू. आपले डाळवांगे तयार आहे.

हेही वाचा >> विदर्भ स्पेशल झणझणीत मसाला ढेमसे; एकदा खाल तर बोटं चाटत रहाल…ही घ्या सोपी मराठी रेसिपी

स्टेप १०
ही भाजी भात,पोळी,भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.

स्टेप ११
मी पोळी,भात,बरोबर भाजी सर्व्ह केली जाते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha special recipe in marathi daal vang recipe in marathi srk
Show comments