Vidarbha Special Recipe: विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे..मेथीचे आळण. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार विदर्भ मेथीचे आळण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेथीचे आळण साहित्य

२ वाटी मेथी (बारीक चिरलेली)
१/२ वाटी बेसन
४-५ चिरलेली मिरची
३ टोमॅटो
१मटीस्पून हळद
१ टीस्पून जिरे-मोहरी
५-६ कढीपत्ता
२-३ सुक्या लाल मिरच्या
चवीनुसार मीठ

मेथीचे आळण कृती

मेथीची पाने बारीक चिरुन घ्या

कढईत तेल घ्या त्यात हिंग, मोहरी, कांदा, मिरचीची फोडणी द्या.

चांगल्या स्वादासाठी लसूण बारीक चिरुन टाका.

हळद आणि मीठ टाका, त्यानंतर चिरलेली मेथीची पाने त्यात टाका.

थोडा वेळ मेथी शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये बेसन टाका आणि चांगले परतून घ्या.

वरुन त्यात पाणी टाका आणि बेसन चांगले शिजू द्या.

हेही वाचा >> खान्देशी पद्धतीचं झणझणीत गिलक्याचे भरीत; भाजी बनवायचा कंटाळा आला तर १० मिनिटांत बनवी ही रेसिपी

लाल मिरचीची फोडणी वेगळ्या कढईत करा आणि तयार मेथीच्या आळणावर टाका.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha special recipe in marathi methicha aalan recipe in marathi srk