आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचा खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे.तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. याच तोंडलीची जबरदस्त अशी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला पाहूयात मोठ्यांसोबत लहान मुलांना आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी कशी बनवायची.
विदर्भ स्पेशल तोंडली भाजी साहित्य
१/२ किलो तोंडली
१ छोटा कांदा
२ टेबलस्पून तिखट
१ टेबलस्पुन मीठ
१/२ टेबलस्पुन हळद
१/२ टेबलस्पुन काळा मसाला
२ टेबलस्पून तेल
बारीक चिरलेली कोथिंबीर
विदर्भ स्पेशल तोंडली भाजी कृती
सर्वप्रथम तोंडली आपण स्वच्छ धुवून घ्यावा आणि गोल गोल कट करून घेऊ, आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात कोथिंबीर आणि कांदे ची फोडणी द्या आणि त्यात गोल कापलेले तोंडली सोडा.
तोंडली तेलात आपल्याला होऊ द्यायची आहे. पाच मिनिटासाठी, तोंडले तेलात मुरले की त्यात आले-लसूण पेस्ट टाका आल-लसुण पेस्ट घातल्यावर आपल्याला पुन्हा तोंडलीला ५ ते १० मिनिटं शिजू द्यायची आहे. त्यानंतर तिखट मीठ हळद आणि गरम मसाला घालून झाकून असाच होऊ द्या.
हेही वाचा >> दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
थोड्या वेळात यात अर्धा ग्लास पाणी सोडा, आणि पुन्हा झाकून असंच होऊ द्या. आता पाणी आटलं की पुन्हा एक ग्लास पाणी घाला आणि पाणी घालून शिजू द्या. पाणी थोडासा आपल्याला आटच द्यायचे आहे. आता तोंडल्याची भाजी तयार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd