Easy Shrikhand Puri Recipe : गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर हा सण सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी शुभ मुहूर्तावर गुढी उभारतात. घर रांगोळी, फुले आणि दिव्यांनी सुंदर सजवतात. घरात श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी पुरी, पुरणपोळी, बासुंदी, केसरीभात, नारळाचे लाडू, कोफ्ता आणि बटाटा वडा इत्यादी प्रकारचे चमचमीत पदार्थ बनवले जातात. पण गुढीपाडव्याला सर्वात जास्त श्रीखंड पुरी बनवली जाते. अनेक जण बाहेरून श्रीखंड आणतात पण आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसे बनवावे, याविषयी जाणून घेणार आहोत.

annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलाईदार श्रीखंड व पुरी कशी बनवावी, याची रेसिपी सांगितली आहे.

व्हायरल व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे –

मलाईदार श्रीखंड आणि पुरी रेसिपी – (how to make Shrikhand Puri at home)

  • एक किलो दही घ्या.
  • सुती कापड घेऊन त्यात दही घट्टसर बांधून ७ ते ८ तास ठेवून द्या.
  • ७ ते ८ तासानंतर त्यातील पाणी निघून जाईल.
  • एका छोट्याशा वाटेत चार चमचे दूध आणि त्यात केशरच्या काड्या घालून घ्या.
  • दहाच्या चक्का चांगला फेटून घ्या.
  • त्यात बारीक केलेली साखर घाला. त्यानंतर त्यात केशरचे दूध घाला.
  • सर्व मिश्रण नीट एकत्रित करा.
  • एक चमचा वेलची पूड, आवडीनुसार ड्राय फ्रूट्स टाका आणि १ तास फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर गव्हाच्या पीठापासून पुऱ्या लाटा आणि गरम तेलातून मंद आचेवर तळून घ्या.

पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)

annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”या पाडव्याला बनवा मलाईदार श्रीखंड आणि पुरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वा खूपच सुंदर दिसते श्रीखंड गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा” तर एका युजरने लिहिलेय, “आज काल सहसा कोणी घरी बनवत नाही, पण पहिले ‘चक्का’ घरीच बनवायचे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्ही पाडव्याला पुरण पोळी करतो” अनेक युजर्सना ही श्रीखंड पुरीची रेसिपी खूप आवडली आहे.