Fansachi Bhaji Recipe In Marathi Video: उन्हाळयात कोकणात खाण्याचे, साठवणीचे असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उन्हाळा आला की आमरस पुरीचा बेत होतोच यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या मेजवान्या आवर्जून केल्या जातात. कोकणातील अशीच एक प्रसिद्ध डिश म्हणजे फणसाची भाजी. ही भाजी विशेषतः दोन पद्धतीने केली जाते. कच्च्या फणसाची तसेच अर्ध्या कच्च्या फणसाच्या गऱ्यांची सुद्धा भाजी. तुम्ही फणसाचे गरे काप करून वाळवून वर्षभर साठवून ठेवू शकता यामुळे वर्षभर कधीही तुम्ही ही चविष्ट भाजी खाऊ शकता, उपवासाला सुद्धा ही भाजी चालते. आज आपण अस्सल कोकणी शैलीतील फणसाच्या भाजीची चविष्ट व झटपट रेसिपी पाहणार आहोत.

फणसाच्या भाजीचं साहित्य

अर्धवट पिकलेला फणस, ओले खोबरे, मिरची, लाल तिखट, हळद आणि मीठ

why water tanks are black in colour
घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीचा रंग काळाच का असतो? अन् त्यावर रेषा का असतात?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Tadoba Andhari Tiger Reserve, Chhota Matka, tiger
Video : ताडोबातील ‘छोटा मटका’ झाडांवर नखाने ओरबाडत होता अन्…
Loksatta vasturang House windows doors Cross ventilation passage
३० खिडक्या आणि २२ दरवाजे…
kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
shani
Shani Margi 2024: शनीची प्रतिगामी चाल ‘या’ राशींच्या आयुष्यात घेऊन येईल आनंदाचे दिवस, मिळेल पैसाच पैसा
Gold-Silver Rate today | gold price gold rate
Gold Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले, सोने खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या आजचा भाव
Katrina kaif wearing black patch arm fitness glucose levels benefits expert tips
नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

फणसाची भाजी कृती

फणस फोडताना हात चिकट होऊ नयेत यासाठी आधी हाताला छान खोबरेल तेल लावून घ्या. साधारण अर्धा पिकलेला कापा फणस भाजीसाठी उत्तम ठरतो. आपण नीट फणस फोडून गरे काढून घ्या. गरे मधून कापून त्याचे दोन तुकडे करा व आठळ्या वेगळ्या पाण्यात काढून घ्या. भाजी चटकन शिजायला हवी असेल तर आठळ्या वेगळ्या वाफवून घेऊ शकता. आता एका टोपात तेल (शक्य असल्यास खोबरेल तेल) घ्या यात मिरचीचे तुकडे टाकून परतवून घ्या. यामध्ये फणसाचे काप घालून त्यावर थोडं मीठ आणि किंचित हळद घालून झाकण ठेवा. वाफेवर गरे थोडे मऊसूद होईपर्यंत शिजू द्या आणि मग त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.वाटल्यास तुम्ही यात तीळ व सुक्या मिरचीची फोडणी सुद्धा घालू शकता.

फणसाची भाजी मराठी रेसिपी

हे ही वाचा<< ड्रायफ्रुट कुल्फीने तुमची दुपार करा खास; अवघ्या तीन वस्तूंमध्ये बनवा झटपट रेसिपी

टीप: खोबरेल तेलाने फणसाच्या भाजीची चव आणखी खुलून येते. तुम्ही रोजचे खाण्याचे तेल व किंचित खोबरेल तेल मिक्स करून वापरू शकता.तुम्ही थंडीच्या दिवसात यात पांढरे तीळ घालून याची चव आणखी वाढवू शकता.