How To Make Curd Or Dahi At Home: उन्हाळा सुरु होताच अगदी घरात बसूनही उन्हाच्या झळांमुळे उकडायला लागले आहे. अशावेळी दुपारच्या जेवणासह ग्लासभर ताक किंवा वाटीभर दही खाल्ले की मन व पोट दोन्ही शांत होते. घरगुती दही असेल तर त्याची चव आणखीनच मस्त लागते. दही केवळ पोटाला गारवा देण्यासाठीच नाही तर शरीरातील अन्य समस्या जसे की, पित्त, किडनीचे रोग, पोटाचे आतड्यांचे रोग यावर सुद्धा परिणामकारक ठरते. जर तुम्हालाही उन्हाळ्यात रोज दही खायचे असेल तर त्यासाठी घरीच दही बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत.

दह्यासाठी विरजण लावण्याची पद्धत आपल्याला माहित असेल पण यामुळे नेहमी पातळ दही तयार होतं. पण आज आपण जी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे आपण खरवासासारखा जाड घट्ट दह्याचा केक बनवू शकता. @masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम पेजवरून झटपट दही घरी तयार करण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे. चला तर मग पाहुयात..

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

साहित्य

पाणी – पाव कप
दूध – गरजेनुसार
कॉर्नफ्लॉवर – १ टेबलस्पून
मिल्क पावडर – १ टेबलस्पून

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात पाव कप पाणी व दुध ओतून एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्या
  • यातील २ कप दूध वेगळ्या भांड्यात काढून घ्यावेत. उरलेल्या दुधात प्रत्येकी १ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर व मिल्क पावडर घालून नीट ढवळून घ्या
  • बाजूला काढून ठेवलेल्या दुधात आता कॉर्नफ्लॉवर घातलेले दूध घालून मंद आचेवर तापवून घ्या.
  • नीट गरम झाल्यावर हे दूध गॅसवरून खाली उतरवा व यातील एक कप दूध बाजूला काढून घ्या.
  • हे बाजूला काढलेले दुध रवीच्या मदतीने घुसळून घ्या. हे दूध थोडे घट्ट झाले की मग उरलेल्या दुधात घालून पुन्हा घुसळून घ्या.
  • दही घट्ट होण्यासाठी आपल्याला एक जाड पॅन घ्यायचा आहे. त्यात एखाद्या पेपरच्या घड्या घालून जाड पुठ्ठा ठेवा व यावर दुसरे छोटे खोलगट भांडे ठेवा
  • या भांड्यात आपले घुसळलेले दुध टाकून झाकून ठेवा.
  • साधारण रात्रभर हे दूध ठेवल्यास सकाळी घट्ट दही तयार होईल.

हे ही वाचा<< २ बटाट्यांचे २०० पापड बनतील, ‘ही’ पळी पापड ट्रिक आहेच भन्नाट; तिप्पट फुलतात व वर्षभर पुरतात

तुम्ही पण ही पद्धत नक्की ट्राय करून पाहा. अशाच अन्य टिप्ससाठी आम्हाला फेसबुक, ट्विटरला फॉलो करायला विसरू नका.