Moong Palak Dosa Recipe: ऑफिसला जायची घाई, घरची कामं, त्यात कधी उठायला उशीर झाला तर नीट नाष्टा करणे शक्यच होत नाही. अशावेळी बिस्कीट, चिवडा असा सुका खाऊ खाऊन पोट भरायचं काम केलं जातं. याने काही प्रमाणात भूक मिटते पण पुन्हा थोड्यावेळाने पोटात कावळे ओरडू लागतात. मग पुन्हा खाण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. म्हणूनच सकाळचा पहिला नाष्टा हा पोटभरीचा असलेले उत्तम. आज आपण यासाठी एक सोप्पा व चविष्ट पर्याय पाहणार आहोत. अनेकांना दूध आवडत नाही, चिकन मासे आपण खात नाही अशावेळी प्रोटीनचा स्रोत असे हे मूग पालक डोसे बेस्ट नाष्टा ठरू शकतात. या झटपट रेसिपीसाठी साहित्य व कृती पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मूग पालक डोसा (साहित्य) (Moong Palak Dosa Ingredients)

• मूग
• चमचे तांदूळ
• पालक
• कोथिंबीर
• हिरवी मिरची
• चिरलेले आले
• मीठ
• मिरी पावडर
• चिरलेला कांदा
• किसलेले पनीर

मूग पालक डोसा रेसिपी (Moong Palak Dosa Recipe)

मूग व तांदूळ २ ते ३ वेळा धुवून स्वच्छ करून घ्या. यानंतर मूग व तांदूळ एकत्र रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी काढून टाका व त्यात पालकाची स्वच्छ धुतलेली पाने, मिरची, कोथिंबीर, आले घालून वाटून घ्या. यात चवीनुसार मीठ व काळीमिरी पावडर टाकून मिश्रण नीट ढवळून घ्या. आता तव्यावर पाण्याचा शिंतोडा मारून मग डोसा पसरवून घ्या. तुम्हाला क्रिस्पी डोसा हवा असल्यास मिश्रण पातळ पसरवून घ्या व उत्तपा हवा असल्यास जाडसर पसरवून घ्या. यावर किसलेले पनीर व कांदा टाकून १०- १५ सेकंद झाकण ठेवून शिजुद्या. मग गरमागरम मूग पालक डोसे चटणीसह सर्व्ह करा.

टीप: डोसे तव्याला चिकटू नयेत यासाठी आधी नारळाच्या किशीने किंवा कांद्याने तेल लावून घ्या व त्यावर मिठाच्या पाणी शिंतडुन घ्या.