Kadhi Pakoda Recipe : सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप हटके असतात. सध्या असाच एक भन्नाट रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कढी पकोडाविषयी सांगितले आहे. तुम्ही कढी पकोडा खाल्ला का? कढी पकोडा चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि बनवायला तितकाच सोपा आहे. जाणून घेऊ या रेसिपी.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

पकोडा

सुरुवातीला एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा घ्या.
या मध्ये पाव चमचा हळद घाला.
त्यात थोडे बारीक चिरलेले मिरचे टाका. एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर टाका.
अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला.
चवीनुसार मीठ घाला.
मीठापूर्वी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घाला.
त्यानंतर चवीपुरते मीठ घाला.
त्यात दोन ते तीन चमचे बेसन पीठ घाला. सर्व मिश्रण नीट एकत्र करा.
हलके पाणी घाला.
थोडा बेकींग सोडा टाका किंवा इनो घाला. सर्व मिश्रण पुन्हा एकत्र करा.
एका कढईत तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यातून भजी तळून घ्या.
भजी कुरकुरीत तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.

कढी

कढी पकोड्यातील पकोडे तयार झाल्यानंतर आता कढी कशी तयार करावी, जाणून घेऊ या.

सुरुवातीला बेसन घ्या.
या बेसनमध्ये ताक टाका आणि घट्ट मिश्रण पातळ भिजवून घ्या. त्यात अगदी थोडं पाणी घाला.
एक कढई घ्या. त्यात तेल गरम करा.
तेल नीट गरम झाले की त्यात मोहरी टाका. त्यानंतर त्यात जिरे टाका.
बारीक चिरलेले लसूण आणि मिरची टाका.
तीन ते चार कढीपत्त्याची पाने टाका. त्यानंतर थोडी हिंग टाकावी आणि त्यानंतर हळद टाकावी.
हळदीला थोडीशी उकळी आली की त्यात बेसन ताकाचे मिश्रण टाका.
हे मिश्रण नीट मिक्स करा आणि चमच्याने सतत फिरवत राहा.
या कढीला उकळी आली की त्यात थोडे पाणी घाला.
कढी तुम्हाला किती पातळ किंवा दाट हवी, या अंदाजावरून पाणी टाकावे.
छान उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घालावे.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
जेवणाच्या पाच मिनिटापूर्वी कढीमध्ये पकोडे टाकावे.

तडका

एक छोटे पातेले घ्या.
त्यात तेल किंवा तूप घ्यावे. तेल किंवा तूप गरम झाले की त्यात दोन लाल मिरच्या आणि जिरे टाका.
गॅस बंद करा. तूप किंवा तेल थोडं थंड झालं की त्यात कश्मिरी लाल मिरची टाका. शेवटी हा तडका कढीवर टाका.

हे कढी पकोडे तुम्ही भाकरी किंवा पोळी बरोबर खाऊ शकता. किंवा जिरा भाताबरोबर हा कढी पकोडा अत्यंत स्वादिष्ट वाटतो.