Kanda Poha Recipe: पोहे हा अनेकांसाठी फक्त नाश्ता नाही तर एक प्रेम आहे. दिवसाची सुरुवात एक प्लेट पोह्याने झाली की दिवस अगदी छान जातो. खरं तर पोह्यांचे अनेक प्रकार आहे. कांदे पोहे, दडपे पोहे, बटाटा पोहे, दही पोहे, तर्री पोहे, इत्यादी. पण काही लोकांना कांदे पोहे खूप आवडतात. आज आपण मऊ आणि मोकळे असे कांदे पोहे कसे बनवायचे, हे जाणून घेणार आहोत.
रेसिपीच्या एका व्हिडीओमध्ये कांदे पोहे कसे बनवायचे याविषयी सांगितले आहे.

टेस्टी कांदे पोहे कसे बनवावे? (How to make Kanda Pohe )

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

साहित्य

  • जाड पोहे
  • शेंगदाणे
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • कढीपत्ता
  • हिंग
  • मीठ
  • हळद
  • साखर
  • कांदा
  • मिरची
  • कोथिंबीर
  • लिंबू
  • शेव

कृती

  • दोन कप जाड पोहे घ्या.
  • सुरुवातीला हे पोहे चाळून घ्या.
  • त्यानंतर त्या पाणी घाला आणि शक्यतो चाळणीमध्ये पोहे भिजवा.
  • तीन ते चार वेळा पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यामुळे त्यात पाणी शिल्लक राहत नाही.
  • त्यानंतर पोह्यांवर झाकण ठेवा. यामुळे पोहे खूप छान फुलतात.
  • सुरुवातीला एक कढई घ्या. त्यात तेल गरम करा. त्यानंतर शेंगदाणे तळून घ्या.
  • शेंगदाणे तळल्यानंतर बाजूला काढा.
  • त्यानंतर त्याच तेलामध्ये मोहरी टाका. त्यानंतर जिरे, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या त्यात टाका.
  • कांदा नीट परतून घ्या.
  • त्यानंतर हळद टाका.
  • त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे घाला.
  • चवीपुरतं मीठ घाला आणि थोडी साखर घाला. नीट परतून घ्या.
  • त्यानंतर मंद आचेवर सात ते आठ मिनिटे पोहे वाफवून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. नीट मिक्स करा.
  • सर्व्ह करताना तुम्ही पोह्यांवर हलकी बारीक चिरलेली कोथिंबीर , शेव आणि तळलेले शेंगदाणे घाला तसेच जोडीला लिंबाची फोड सर्व्ह करा.
  • कापसासारखे मऊ कांदे पोहे तयार होईल.

पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)

MadhurasRecipe Marathi या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या ३ गोष्टी लक्षात घेऊन बनवा कापसासारखे मऊ पण मोकळे कांदे पोहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना ही रेसिपी आवडली आहे. काही लोकांनी अशा पद्धतीने पोहे बनवल्यानंतर अप्रतिम झाले, असे सुद्धा सांगितले आहे.