Lemon Rice Recipe Video : दररोज टिफीनसाठी काय बनवावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. रोज भाजी पोळी खाऊन आपण कंटाळतो. उन्हाळ्यात भाजी पोळी खायची इच्छा सुद्धा होत नाही. छान स्वादिष्ट चटपटीत तसेच टिफीनसाठी लवकरात लवकर बनवता येईल, अशी रेसिपी आपण शोधत असतो. आज आपण टिफीनसाठी एक हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी लेमन राइस बनवला आहे का? हा लेमन राइस कसा बनवतात? किंवा लेमन राइस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागतात, हे आज आपण आज आपण जाणून घेणार आहोत.
युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लेमन राइसची अगदी सोपी रेसिपी सांगितली आहे.

व्हिडीओ सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • तेल
  • मोहरी
  • उडीद डाळ
  • चणा डाळ
  • शेंगदाणे
  • लाल मिरचे
  • कढीपत्ता
  • लसूण
  • हळद
  • शिजवलेला भात
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर

हेही वाचा : Misal Rassa Recipe Video : फक्त १० मिनिटात असा बनवा मिसळ रस्सा! अस्सल मराठी चवीसाठी पाहा ही सोपी रेसिपी

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

कृती

  • एका कढईत तेल गरम करा.
  • तेल गरम झाले की त्यात मोहरी टाका.
  • त्यानंतर अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा चणा डाळ टाका आणि नीट तळून घ्या. त्यानंतर त्या शेंगदाणे टाका. ते पण नीट तळून घ्या. त्यानंतर दोन लाल मिरच्या टाका आणि नीट परतून घ्या.
  • कढीपत्त्याची ६-७ पाने टाका. त्यानंतर सोलून घेतलेले आणि बारीक चिरलेले लसूण त्यात टाका.
  • सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घाला.
  • त्यानंतर त्यात शिजवलेला भात टाका. चवीनुसार मीठ टाका आणि एक चमचा लिंबाचा रस टाका त्यानंतर भात नीट परतून घ्या. शेवटी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
  • तुमचा लेमन राइस तयार होईल.

हा लेमन राइस तुम्ही टिफीनसाठी बनवू शकता किंवा घरी आमरसाच्या मेजवानीमध्ये सुद्धा बनवू शकता.

हेही वाचा : Tiffin Special Recipe: मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा हेल्दी अन् टेस्टी मिक्स व्हेजिटेबल चीझ पॅाकेट रेसिपी

आहेत. Veggie Recipe House या युट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना ही हटके रेसिपी आवडली आहे. एका युजरने लिहिलेय, “मी खूपदा लेमन राइस विषयी ऐकले आहे पण कधी बनवून पाहिले नव्हते. मला वाटायचे लेमन राइस बनवणे खूप कठीण आहे पण जेव्हा मी व्हिडीओ बघितला, माझे मत बदलले” तर एका युजरने लिहिलेय, “छान आणि साधी रेसिपी. मला खूप आवडली.” एक युजर लिहितो, “ही बनवायला खूप सोपी आहे. मी हा व्हिडीओ पाहून बनवून बघितली. खूप छान टेस्ट होती.