Papad Chutney Recipe : पापड हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. जेवण करताना तोंडी लावायला पापड असेल तर जेवणाचा स्वाद वाढतो. कुणाला तांदळाचे पापड आवडतात तर कुणाला ज्वारीचे पापड आवडतात. पापडामध्ये अनेक प्रकार आढळतात पण तुम्ही कधी पापडाची चटणी खाल्ली आहे का? होय, पापडाची चटणी. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पापडाची चटणी कशी बनवली आहे, हे दाखवले आहे. (video of Papad Chutney Recipe how to make Papad Chutney in just five minutes)
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे – (Papad Chutney Recipe )
साहित्य –
- उडीद डाळीचा पापड
- भाजलेले शेंगदाणे
- लाल तिखट
- मीठ
- लसणाच्या कळ्या
- चाट मसाला
- भाजून घेतलेले खोबरे
हेही वाचा : १५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती
कृती
- सुरुवातीला गॅसवर उडीद डाळीचा पापड भाजून घ्या.
- या पापडाचे तुकडे करा.
- त्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्या.
- त्यात थोडे लाल तिखट टाका.
- चवीनुसार मीठ टाका.
- पाच सहा लसणाच्या कळ्या टाका.
- अर्धा चमचा चाट मसाला टाका.
- गॅसवर भाजून घेतलेलं खोबरं घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाका.
- हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
- स्वादिष्ट अशी पापडाची चटणी तयार होईल.
- ही चटणी जेवण करताना तुम्ही ताटात सर्व्ह करू शकता. या चटणीने जेवणाचा स्वाद वाढेन.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
/
हेही वाचा : Video : घरच्या घरी बनवा चहाबरोबर खायला आवडणारी खारी! ही सोपी रेसिपी एकदा पाहाच
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
हेही वाचा : Bun Dosa : डोसा, इडली, मेदूवडा खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा ‘हा’ पदार्थ, वाचा सोपी रेसिपी
maharashtrian_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “८ ते १० दिवस टिकणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट पापडाची चटणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे ताई” तर एका युजरने लिहिलेय, “खूप अप्रतिम चटणी केली आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी नक्की एकदा तरी बनवून बघणार” एक युजर लिहिते, “मी पहिल्यांदा इतकी सोपी आणि भारी रेसिपी पाहिली. पापड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. त्यामुळे याची चटणी पण सर्वांना आवडणार.. मी नक्की ही रेसिपी ट्राय करेन.”