Ram Laddoo Marathi Recipe: आज जगभरात रामनामाची चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या गल्लोगल्ली राम नामाच्या एका खास पदार्थाची आज आपण ओळख करून घेणार आहोत हा पदार्थ म्हणजे ‘चाट’ व ‘भजी’ अशा दोन्ही गटात येणारा ‘राम लड्डू’! थंडीच्या दिवसांमध्ये दिल्लीसह उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी हा पदार्थ विकला जातो. ज्याप्रमाणे मुंबई पुण्याच्या रस्त्यांवर वडापाव हा सगळीकडे आढळतो तसेच राम लड्डू उत्तरेकडे सर्वत्र पाहायला मिळतात. खरंतर या पदार्थाला रामावरून नाव का पडले हे अद्याप स्पष्ट नसले तरी याची चव ही खवय्यांसाठी मोठी पर्वणी ठरते. आज आपण घरच्या घरी राम लड्डू कसे करायचे हे पाहणार आहोत. छान थंडी पडली असताना गरमागरम स्वादिष्ट राम लड्डू अगदी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला बेस्ट पर्याय ठरतील. चला पाहूया सोपी रेसिपी..

राम लड्डू साहित्य

अर्धा कप मूग डाळ
पाव कप चणा डाळ
आल्याचा तुकडा
जिरे
हिरव्या तिखट मिरच्या
हिंग
मीठ

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

चटणीसाठी साहित्य

कोथिंबीर- पुदिना
हिरव्या मिरच्या
लसूण
जिरे
काळे मीठ
आमचूर पावडर
लवंग
सिक्रेट (शेव)

सजावटीसाठी

किसलेला मुळा

राम लड्डूची कृती

  1. सर्वप्रथम, ½ कप (१२० ग्रॅम) मूग डाळ आणि ¼ कप (५० ग्रॅम) चणाडाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर, दोन्ही डाळी १.५ कप पाण्यात सुमारे ३ ते ४ तास किंवा रात्रभर भिजवत ठेवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फक्त ¾ कप मूग डाळ वापरू शकता. चणाडाळ हा आवडीनुसार निवडता किंवा टाळता येणारा पर्याय आहे.
  2. डाळींमधील पाणी काढून टाका आणि मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या डाळी घ्या. १ इंच आले (सोलून चिरून) टाका) तसेच चिरलेली हिरवी मिरची , ½ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या.
  3. फार न घालता वाटण वाटून घ्या. अगदीच शक्य नसेल तर चमचाभर पाणी घाला. थोडं घट्ट वाटण तयार करा.
  4. कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, मध्यम आकाराच्या लसणीच्या पाकळ्या, लवंग, काळे मीठ व आमचूर पावडर घालून वाटून घ्या. तुम्हाला आमचूर पावडर मिळत नसल्यास लिंबाचा रस किंवा डाळिंबाचे दाणे वापरू शकता. चटणीत शक्य झाल्यास थोडी नायलॉन शेव टाकल्यास त्याची छान चव येऊ शकते.
  5. तयार डाळीच्या मिश्रणाचे लहान गोळे करून तळून घ्या.
  6. राम लड्डू सर्व्ह करताना त्यावर आधी ताजा मुळा किसून बारीक तुकडे घाला व वरून चटणी, चाट मसाला टाकून गरमागरम चहाबरोबर खाऊ शकता.

हे ही वाचा<< Video: ४ ते ५ संत्र्यांनी घरी बनवा अस्सल नागपुरी संत्रा बर्फी; रेसिपीसह फायदे वाचून तर गोडवा आणखी वाढेल

@foodiesfood_court या इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही रेसिपी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. आपापल्या आवडीनुसार आपण यातील पदार्थ कमी जास्त वापरू शकता किंवा डाळींचे पर्याय सुद्धा मिक्स करू शकता. या रेसिपीचा हिरो हा मुळा व मूग डाळ आहे त्याशिवाय इतर वस्तू आपल्या आवडीनुसार वापरून तुम्ही प्रयोग नक्कीच करून पाहू शकता.

Story img Loader