Neer Dosa Recipe In Marathi: डोसा करायचा म्हणजे आदल्या रात्री तांदूळ, डाळ वाटून ठेवा, बरं ते पीठ नीट आंबवण्यासाठी कष्ट घ्या हा सगळ्या खटाटोप करण्यापेक्षा एक स्वस्तात मस्त पर्याय म्हणजे नीर डोसा. आज आपण सोशल मीडियावर व्हायरल होणारे शिल्पा शेट्टीची पारंपारिक नीर डोसा रेसिपी पाहणार आहोत. शिल्पा सांगते की ही रेसिपी तिच्या आजीकडून तिच्या आईला आणि आता तिला सुद्धा मिळाली आहे. एका कुकिंग व्हिडिओमध्ये शिल्पाने स्वतः ही रेसिपी शेअर केली होती. बहुतांश मंगलोरी लोकांसाठी हा एक प्रसिद्ध नाष्टा आहे. पातळ तरीही मऊसर, हलका नीर डोसा, सांबार आणि नारळाची चटणीसह खाल्ल्यास एक संपूर्ण जेवण बनवण्याचे कष्ट वाचवू शकतो. चला तर मग…
नीर डोसा साहित्य (Neer Dosa Ingredients)
- 1 कप तांदूळ
- पाणी
- नारळ (ताजे, तपकिरी साल काढून घ्या)
- मीठ
- तेल
नीर डोसा रेसिपी (Neer Dosa Recipe)
- तांदूळ स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घ्या. त्यांना ४ ते ५ तास किंवा रात्रभर पुरेशा पाण्यात भिजवून ठेवा.
- नंतर भिजवलेले तांदूळ आणि ओले खोबरे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- गरजेनुसार पाणी घाला.
- वाटलेले पीठ पातळ, वाहते असावे यासाठी वाटून झाल्यावर पुन्हा २ कप पाणी घाला व ढवळून घ्या.
- नंतर आवश्यकतेनुसार मीठ घालून मिक्स करावे.
- नॉन-स्टिक पॅन मध्यम ते मध्यम-उच्च आचेवर गरम करा. ½ टीस्पून तेल पसरवून घ्या
- आपण रवा डोसा करतो तसे पिठ बाहेरून आत हलवत ओता.
- झाकण ठेवून डोसा शिजवून घ्या.
- डोसा वाटीच्या गोलाकार आकारात हवा असेल तर गाळणी उलट ठेवून त्यावर हा डोसा ठेवा.
- खोबऱ्याची चटणी, व्हेज कोरमासह हा नीर डोसा चविष्ट लागतो.
Video: शिल्पा शेट्टी स्पेशल नीर डोसा
हे ही वाचा<< फणसाच्या गऱ्याची चमचमीत भाजी शिकून घ्या; हात चिकट न करता अर्ध्या तासात बनवा रेसिपी
तुम्हीही ही रेसिपी करून पाहा व कशी होते हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.