Jhunka Vadi Recipe: पावसाळा म्हणजे मस्त गरमागरम भजी हे एक समीकरण वर्षानुवर्षे आपणही जपले आहे. भज्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्हीही चाखले असतील. भजी तुम्ही अगदी घरच्याघरी बनवली, सोडा घातला नाही, ताज्या तेलात तळली तरीही तेल ते तेलच. त्याचा परिणाम घशावर होतोच. घसा खवखवणे, खोकला लागणे असे अनेक त्रास यामुळे होऊ शकतात. म्हणूनच आज आपण भजीच्या तोडीस तोड पण तरीही त्यातला हेल्दी पर्याय पाहणार आहोत. तुम्हाला चमचमीत झुणका हा पदार्थ माहित असेलच हो ना? आता याच झुणक्याची खमंग कुरकुरीत वडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत.

मराठीतील एक प्रसिद्ध रेसिपी चॅनेल @रुचकर मेजवानी यावरून या चमचमीत रेसिपीची सविस्तर कृती जाणून घेऊया…

Kaju katli recipe diwali special Kaju katli at Home easy recipe
Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Vishnu Manohar, Vishnu Manohar Dosa,
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डोसा आणि विक्रम, काय आहे वाचा
Diwali Faral Recipe Shankarpale
Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी
do patti
अळणी रंजकता
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल
Find out if you should switch to cauli rice like Kartik Aaryan did while shooting for Chandu Champion
चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

झुणका वडी साहित्य:

  • बेसन
  • तेल
  • मोहरी
  • आलं – लसूण पेस्ट
  • कांदा
  • कोथिंबीर
  • पाणी
  • लाल मसाला
  • धणे – जिरे पूड
  • तीळ

झुणका वडी कृती

कढईत एक टेबलस्पून तेल घाला. तेल तापल्यावर टेबलस्पून मोहरी, आलं – लसूण पेस्ट घालून परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राऊन येईपर्यंत परतून घ्या. मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. लाल तिखट, धणे – जिरे पूड घालून मिक्स करा. यात एक कप पाणी घालून काही सेकंद उकळून घ्या. मग यात एक कप बेसन घालून चमच्याने ढवळत राहा. मिश्रण फार पातळ किंवा अगदीच कोरडे राहू नये असे बघा. साधारण कोबीच्या वड्या करताना किंवा पाटवड्या करताना जशी पिठाची स्थिती असते तशी झाली की गॅस बंद करा.

दुसरीकडे एका ताटाला तेल लावून परसवून घ्या. मग हे मिश्रण ताटात पसरवून घ्या. अशावेळी हातात ग्लोव्ह घालून थांबल्यास हाताला चटके लागणार नाहीत. मिश्रण सेट झालं की वड्या पाडून घ्या. या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करून खरपूस भाजून घेऊ शकता किंवा तेलात डीप फ्राय करू शकता. तयार वड्या ओलं खोबरं, कोथिंबीर, व तिळाची फोडणी देऊन ही फोडणी वडयांवर टाका. हिरवी चटणी किंवा सॉस या वड्यांबरोबर छान लागतो.

हे ही वाचा<< पीठ मळताना हात चिकट न करता झटक्यात काम करा पूर्ण; ‘हे’ जुगाड तुमचे कष्ट वाचवतील, पाहा Video

तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा आणि कशी झाली ते कळवायला विसरू नका.