के नायडू
साहित्य
आणखी वाचा
दीड कप संत्र्याचा रस, अर्धा कप सफरचंदाचा रस, १ कप ताजे नारळाचे पाणी, १ चमचा लिंबूरस, दीड कप अननसाचे तुकडे, ३ किवी, ८ स्ट्रॉबेरी, दीड कप प्यायचा सोडा, मीठ, बर्फ
कृती
एका मोठय़ा ग्लासात संत्र्याचा रस, सफरचंदाचा रस, नारळाचे पाणी आणि लिंबूरस एकत्र करा. आता हे मिश्रण फ्रिजमध्ये दोन तास ठेवा. अगदी हे मॉकटेल पिण्याच्या आधी ते फ्रिजमधून काढा. त्यात अर्धा कप सोडा घाला. लिंबाची एक फोड ग्लासाच्या कडेवरून फिरवा आणि त्यावर मिठाचा कोट द्या. आता त्यात बर्फाचे तुकडे घाला. सफरचंद, संत्र्याच्या रसांचे मिश्रण या ग्लासात ओता.