Batata Poha Roll: बटाटा वडा, पोह्याचे कटलेट हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण आवडीने खातात. त्यामुळे अनेकजण हे पदार्थ सतत बनवत असतात. पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बटाटा पोहा रोल कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बटाटा पोहा रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (Batata Poha Roll)

  • ५-६ उकडलेले बटाटे
  • १ कप पोहे भिजवलेले
  • ४ ब्रेडचे तुकडे
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा धने पावडर
  • कोथिंबीर
  • तेल तळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार

बटाटा पोहा रोल बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम बटाटा पोहा रोल बनवण्यासाठी एका भांड्यात उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या.
  • त्यानंतर ब्रेडचे तुकडे बारीक करून बटाट्यात घालून मिक्स करा.
  • आता त्या मिश्रणात भिजवलेले पोहे घ्या आणि बटाटे आणि ब्रेड क्रंब्ससह चांगले मॅश करा.
  • आता त्यात धने पावडर, चाट मसाला, लाल तिखट, मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर सर्व मिश्रणाचे रोल तयार करा.
  • आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात तेल घाला.
  • तेल गरम झाले की त्यात तयार केलेले रोल लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  • सॉससोबत सर्व्ह करा.