Vegan Homemade Almond Milk Recipe In Marathi: गेल्या काही वर्षांमध्ये लोक शांकाहाराकडे वळत आहे. यात तरुण मंडळींची संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळतात. शांकाहारी जेवणामध्ये गाय, बकरी अशा प्राण्यांच्या दुधाचा समावेश असतो. वेगन (Vegan) आहार पद्धतींचा अवलंब करणारे लोक हे फक्त वनस्पतीद्वारे मिळणाऱ्या गोष्टींचे सेवन करत असतात. आहारशैलीतील या बदलांमुळे हे लोक प्राण्यांच्या दुधाऐवजी Almond Milk, Soy Milk असे पर्याय निवडत असतात.
प्राण्यांच्या दुधाला पर्याय म्हणून बहुसंख्य लोक हे बदामापासून तयार केल्या जाणाऱ्या Almond Milk चा वापर करत असतात. वेगन लोकांप्रमाणे फिटनेसच्या बाबतीत जागरुक असलेले लोक सुद्धा बदामाचे दूध पित असतात. बाजारामध्ये बदामाचे दूध सहज उपलब्ध होते. पण त्याची किंमत जास्त असू शकते. अशा वेळी तुम्ही बदाम विकत घेऊन घरच्या घरी बदामाचे दूध बनवून त्याचा वापर करु शकता. आज आम्ही तुम्हाला Homemade Almond Milk कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य:
- एक कप किंवा २५० ग्रॅम बदाम
- पाच कप किंवा १.२५ लिटर पाणी
कृती:
- बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. (किमान ७-८ तास)
- त्यानंतर बदाम व्यवस्थितपणे सोलून घ्या. त्यावरील आवरण काढून टाका.
- सर्व बदाम मिक्सरमध्ये टाका. त्यात पाच कप किंवा १.२५ लिटर पाणी टाकून मिश्रण मिसळा आणि मिक्सर सुरु करा.
- आता मिक्सरच्या भांड्यातील मिश्रण मलमलच्या कापडामध्ये घेऊन ते गाळून घ्या.
- गाळल्यानंतर तुमचे Homemade Almond Milk तयार होईल.
आणखी वाचा – आमरस काळा पडू नये यासाठी ‘या’ ट्रिक्सची घ्या मदत; आंब्याचा सीझन संपल्यावरही खा रसाळ आमरस
आहारतज्ज्ञ अंशू दुआ यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बदामाचे दूध कसे तयार करावे हे सागितले आहे. शिवाय त्यांनी या दुधाच्या सेवनाच्या फायद्यांची माहिती देखील दिली आहे.