Summer Special Drink: उन्हाळा म्हटलं की आवर्जून कलिंगड खाण्याचे दिवस. फळांमधे कलिंगड हे सगळयांचं आवडतं फळ. रसरशीत, लाल रंगाचं आणि गोड चवीचं कलिंगड उन्हाची काहिली कमी करतं. उन्हामुळे सतत लागणारी तहान नियंत्रित करण्याचं काम कलिंगड करत असतं. पण कलिंगड खातांना ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून खाल्लं जातं असं नाही तर ते जिभेला आणि डोळ्यांना भावतं म्हणून खाल्लं जातं. पण कलिंगडमधे असलेल्या पोषक तत्त्वांमुळे कलिंगड हे अनेक कारणांनी आरोग्यास फायदेशीर ठरतं. डोळे, हाडं, हदय आणि स्नायूंचं आरोग्य जपण्यासाठी कलिंगड हे खूप उपयुक्त ठरतं. कलिंगडचं सरबत यासाठी जास्त प्रभावी मानलं जातं. पण बाहेर मिळणारं, अति साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं कलिंगडचं सरबत हे हानिकारक ठरु शकतं. घराच्याघरी तयार केलेलं कलिंगडचं सरबत आरोग्य राखण्यास फायदेशीर ठरतं.
मोहब्बत का शरबत साहित्य
१/२ वाटी कलिंगडाचे बारीक तुकडे
१/२ कप
२ टेबलस्पून रुह अफ्जा सिरप
भरपूर बर्फाचे खडे
१ उंच ग्लास
मोहब्बत का शरबत कृती
१. सर्वप्रथम १/२ वाटी कलिंगडाचे बारीक तुकडे करुन घ्या. सगळे साहित्य एकत्र करून ठेवा.
२. ग्लासमध्ये कलिंगडाचे बारीक तुकडे घाला.त्यावर रुह अफ्जा सिरप घाला.
३. भरपूर बर्फाचे खडे घालून त्यावर दूध ओतून घ्या.पुन्हा रुह अफ्जा सिरप घाला.
हेही वाचा >> Jaggery Sharbat: उन्हाळ्यात पोटाच्या अनेक विकारांवर ठरेल रामबाण गुळाचा सरबत; लगेच नोट करा सोपी मराठी रेसिपी
४. ढवळून कलिंगडाचे तुकडे घालून सर्व्ह करावे मोहब्बत का शरबत!