Chicken 65 Recipe In Marathi: आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो, तेव्हा हॉटेलमध्ये जेवतो. बऱ्याचजणांना हॉटेलमध्ये स्टार्टर्स खायची सवय असते. आपल्याकडे Chicken 65 हा पदार्थ स्टार्टर म्हणून चवीना खाल्ला जातो. अनेकांना हा पदार्थ खूप आवडत असतो. पण ही डिश फक्त हॉटेलमध्ये मिळते असे लोकांना वाटते. खरं तर Chicken 65 घरच्या घरी देखील बनवता येतो. वीकेंडला दुपारी काहीतरी हलकं खायचं असेल किंवा नाश्ताला चविष्ट काहीतरी खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात Chicken 65 घरी कसे बनवायचे..
साहित्य:
- बोनलेस चिकन फिलेट, क्यूब्स – २५० ग्रॅम
- चिरलेली लसूण – १.५ टीस्पून
- कढीपत्ता – १० ते १५ पाने
- मिरपूड पावडर – १/४ टीस्पून
- रिफाइंड ऑईल – १ टीस्पून
- चिकन तळण्यासाठी तेल
मॅरिनेशनसाठी –
- मीठ – १/२ टीस्पून
- आलं लसूण पेस्ट – १.५ टीस्पून
- काश्मिरी मिरची वापडर – २ टीस्पून
- मिरपूड पावडर – १/२ टीस्पून
- दही – २ चमचे
- रंग (गरज वाटत असल्यास)
बॅटरसाठी –
- कॉर्न फ्लोअर – २ टीस्पून
- तांदळाचे पीठ – १ टीस्पून
पूर्वतयारी:
- बोनलेस चिकनचे तुकडे धुवून पुन्हा कोरडे होऊ द्या. पुढे त्यांचे छोट्या आकारात तुकडे करा.
- त्यानंतर ते तुकडे वरील पदार्थांनी मॅरिनेट करा आणि ते एका तासासाठी तसेच बाजूला ठेवून द्या.
- एक तास पूर्ण झाल्यावर त्यात कॉर्न फ्लोअरसह तांदळाचे पीठ घाला. सर्व पदार्थ व्यवस्थितपणे मिसळा.
- लसणाच्या पाकळ्या चिरुन घ्या. तसेच हिरव्या मिरच्या कापून ठेवा.
कृती:
- एका कढाईमध्ये तेल घ्या. ते मध्यम प्रमाणात गरम झाल्यावर त्यात एक-एक तुकडा हळूवारपणे सोडा.
- चिकन तळताना पॅनमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. चिकनचा रंग बदलल्यावर तुम्हाला ते तयार झाले आहे हे कळेल.
- पूर्णपणे तळल्यानंतर ते तुकडे कढाईमधून बाहेर काढा. टेम्परिंगसाठी पॅनमध्ये १ चमचा रिफाइंड ऑईल गरम करा.
- पुढे त्यात चिरलेली लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता त्यावर घाला. ते मिश्रण ३० सेंकदांसाठी गॅसवर राहू द्या.
- तळलेल्या चिकनचे तुकडे त्यात घालून मिक्स करा आणि एक मिनिटभर ते पॅनमध्ये शिजवा. (शिजवतानाही ते मिक्स करा.)
- आता १/४ टीस्पून मिरी पावडर घाला. मिक्स करा आणि आणखी एका मिनिटासाठी ते मंद आचेवर ठेवा.
- पॅनमधून ते तुकडे बाहेर काढून गरमागरम स्टार्टर्स म्हणून खायला द्या.