Hariyali Chicken Recipe In Marathi: आपल्याकडे वीकेंडला बऱ्याचशा घरांमध्ये नॉन व्हेज बनवले जाते. काहीजणांकडे तर ठरवून चिकन किंवा मटणाचा बेत केला जातो. वीकेंड्सना सुट्टी असल्याने सर्वजण घरी असतात. अनेकदा लोक तेच ते पदार्थ खाऊन कंटाळत असतात. तेव्हा जेवणाला काय बनवायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. अशा वेळी काहीतरी हटके बनवायचा विचार करत असल्यास तुम्ही हरियाली चिकन हा पदार्थ घरी बनवू शकता. कमी साहित्यामध्ये बनणारा हा पदार्थ अत्यंत चविष्ट असतो. हरियाली चिकनमध्ये दहीसह कोथिंबीर, पुदिना आणि पालक असल्याने त्याला एक वेगळीच चव असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

  • अर्धा किलो चिकन
  • १ कप दही
  • २ कांदे
  • १ टोमॅटो
  • १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ कप बारीक चिरलेला पुदिना
  • अर्धा कप चिरलेला पालक
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • २ चमचे आले-लसूण वाटलेले
  • १ चमचा हळद
  • २ चमचे चिकन मसाला
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा अख्खा गरम मसाला (१ मोठी वेलची, १ दालचिनी, ४ लवंग, २-३ तमालपत्रे)
  • मीठ
  • तेल

कृती :

  • चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवावे.
  • मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक, पुदिना वाटून त्यात दही मिसळून एकजीव वाटून घ्यावे.
  • एका पातेल्यात तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला आणि बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात चिकन घालून परतावे. आता हे चिकन नीट शिजवून घ्यावे.
  • ताटावर पाणी घालून ते ताट या पातेल्यावर ठेवून चिकन शिजवावे.
  • यानंतर त्यात सर्व मसाले आणि तयार केलेले हिरवे वाटण घालावे. पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यावे.

आणखी वाचा – Weekend ला घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाइल चविष्ट ‘Chicken 65’! आजच करा खास नॉन-व्हेज बेत

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekend special hotel style hariyali chicken recipe in marathi how to make this chicken dish at home know more yps