डॉ. सारिका सातव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

*  ओली हळद- एक वाटी (कापून)

*   आले- अर्धा वाटी (कापून)

*   हिरवी मिरची- अर्धा वाटी

*   लिंबू रस- अर्धा वाटी

*   मीठ- चवीपुरते

*   मोहरी- एक मोठा चमचा

*   मेथी दाणे – अर्धा चमचा

*   मोहरी तेल, लोणचे मसाला

कृती-

*   ओली हळद स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करावे. * त्याचप्रमाणे आलेसुद्धा स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करून घ्यावे. * हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी. * बारीक केलेली हळद, आले व मिरची एकत्र करून मीठ, लिंबूरस टाकून मिसळावे. * भाजलेली मोहरी व मेथीदाणे यांची जाडसर पावडर करावी. *  तेल तापवून थंड करावे. *  चवीप्रमाणे लोणचे मसाला मिळसून इतर सर्व मिश्रणात हे मिसळावे. * काचेची बरणी थोडी तापवून हे मिश्रण नंतर त्यात भरावे. * झाकण घट्ट लावून साते ते आठ दिवस उन्हात ठेवावे.

वैशिष्टय़े

* थंडीत खाण्यासाठी उपयुक्त.

भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, मधुमेह, अपचन, बद्धकोष्ठता या विकारांवर या पदार्थाचा उपयोग होतो.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wet turmeric pickle recipe zws