White Onion Pickle recipe: भारतीय जेवणात पोळी, भाजी, वरण भात याशिवाय इतरही अनेक पदार्थ दिले जातात. चटणी, पापड, कोशिंबीर आणि लोणचे हे पदार्थ जेवणासोबत दिले जातात. हे जेवणाची चव आणखी वाढवतात. अशा वेळी तुम्हाला नेहमीच्या लोणच्याऐवजी काही नवीन सर्व्ह करायचे असल्यास पांढऱ्या कांद्याचे लोणचे तयार करा. ही एक नवीन साइड डिश आहे, जी तुम्ही पोळी, पराठ्यासोबत खाऊ शकता. याशिवाय ही वरण भातासोबतच खायला टेस्टी लागते. कांद्याचे लोणचे फ्रिजमध्ये ठेवून काही दिवस साठवू शकता. हे टेस्टी कांद्याचे लोणचे खाऊन सर्व जण तुम्हाला याची रेसिपी विचारतील. हे बनवायला सोपे आणि खायला चविष्ट आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे पांढऱ्या कांद्याचे लोणचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढऱ्या कांद्याचे लोणचे साहित्य

३-४ लहान पांढरे कांदे
१ मध्यम आकाराची कैरी
२ टेबल स्पून रामबंधू आचार मसाला
१/२ टेबल स्पून मीठ
१/२ टेबल स्पून राई
१/४ टेबल स्पून हिंग
१ टेबल स्पून तेल

पांढऱ्या कांद्याचे लोणचे कृती

१. कांदयाची साले काढून कांदा पातळ उभा चिरुन घेणे. त्यानंतर कैरीचे साल काढून किसून घेणे.

२. कांदा कैरी मिक्स करून त्यात आचार मसाला, मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

३. गॅसवर मध्यम आचेवर फोडणी पात्र ठेऊन त्यात तेल घालून तापल्यावर त्यात राई व हिंग घालून फोडणी तयार करून थोडी थंड झाल्यावर कांदा कैरीच्या मिश्रणात ओतावी.मिसळून घ्यावे.

हेही वाचा >> एकदा खाल्ली की खातच राहावीशी वाटणारी गाजराची बर्फी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

४. अशाप्रकारे पांढरा कांदा कैरीचे लोणचे तयार.

५. थोडा वेळ ठेवा आणि नंतर सर्व्ह करा. पानावर डावी कडील बाजूस वाढावे.